कर्नाटक मंत्रीमंडळ विस्तारात आता पाच उपमुख्यमंत्री  

बोम्मई यांनी नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा,जे.पी.नड्डा यांची भेट घेतली
Copy of Sarkarnama Banner (26)_1.jpg
Copy of Sarkarnama Banner (26)_1.jpg

नवी दिल्ली : बी. एस. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर बसवराज बोम्मई यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी पहिला दिल्ली दौरा केला. कर्नाटकातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुढच्या आठवड्यात मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. राज्यात भाजपमधील प्रत्येक घटकाला सामावून घेत संतुलन राखणे, हे मंत्रीमंडळ विस्तारात भाजपसमोर मोठ आव्हान आहे. 

बोम्मई यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi,, गृहमंत्री अमित शहा, भाजचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतली. यावेळी लवकरात लवकर मंत्रीमंडळाच्या विस्तार करण्याबाबत चर्चा झाली. राज्यातील प्रत्येक घटकाला आपल्याकडे वळविण्यासाठी भाजप सध्या प्रयत्न करीत आहे. त्यासाठी कर्नाटकामध्ये पाच उपमुख्यमंत्री बनविण्याची तयारी भाजप करीत असल्याचे सुत्रांनी सांगितले.  बोम्मई म्हणाले, ''आमचे सरकार रबर स्टॅम्प राहणार नाही. विविध विषयाबाबत पुन्हा एकदा दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहे." 

मोदी म्हणतात, 'जीएसटी भरायला नकार द्या'
येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात बोम्मई हे दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री होते. त्यांच्याकडे गृहमंत्रीपदाचा भार होता. तसेच बोम्मई हे येडियुरप्पा यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळं बोम्मई यांची निवड झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. बोम्मई यांच्या निवडीत येडियुरप्पा यांचाच हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. त्यामुळं मंत्रिमंडळ विस्तारातही येडियुरप्पा यांचाच वरचष्मा राहील, असे बोलले जात होते. 

शिवसेनेचा गृहमंत्र्यांचा सल्ला 'वेळीच पावले उचला'
येडियुरप्पा यांनी बोम्मई यांना चांगले काम करण्याचा सल्लाही दिला. बोम्मई यांनी शपथ घेतल्यानंतर गरीबांना मदत करण्यावर भर असेल, असे सांगितले आहे. दरम्यान, बोम्मई हे त्यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री होते. तसेच त्यांच्याकडं कायदा, संसदीय कार्य ही खातीही होती. 61 वर्षांचे बोम्मई हे माजी मुख्यमंत्री एस. आर. बोम्मई यांचे पुत्र आहेत. कर्नाटकातील लिंगायत समाजाचे वर्चस्व विचारात घेऊन भाजपने याच समाजातील बोम्मई यांना पुढे आणले आहे. 

 Edited by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com