Maharashtra Budget : अर्थसंकल्पात घोषणांचा महापूर; 'पंचामृता'च्या माध्यमातून फडणवीसांनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग!

Devendra Fadnavis News : शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला.
Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis NewsSarkarnama

Devendra Fadnavis News : शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात फडणवीसांनी पुढील काळात होणाऱ्या महापालिका आणि 2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेत त्या जिंकण्याच्यादृष्टीने भरीव घोषणा केल्या.

अर्थसंकल्पात समाजातील विविध घटकांना डोळ्यासमोर ठेवून अनेक घोषणा करण्यात आल्या. यामध्ये आरोग्य, शेती, महिलावर्ग, अंगणवाडी सेविका, शिक्षण, शिक्षणसेवकांसह अनेकांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. अर्थसंकल्पातील सर्व घोषणा लक्षात घेता आगामी काळात होणाऱ्या लोकसभेसाठी फडणवीसांनी रणशिंग फुंकल्याचे जाणकारांचे मत आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना पंचामृत मांडले. त्यामध्ये पहिले अमृत म्हणजे 'शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी', यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या. शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर दोन हजार रुपये देण्याचा निर्णय जाहिर केला. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता वार्षिक 12 हजार रुपये मिळणार आहेत.

Devendra Fadnavis News
Ajit Pawar News : 1 एप्रिलला नागरिकांना मोठा 'शाॅक' बसणार; अर्थसंकल्पानंतर अजित पवारांचा खळबळजनक दावा

दुसरे अमृत म्हणजे, 'महिला, आदिसासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास', या माध्यातून फडणवीस यांनी मुलींसाठी लाडकी लेख योजना सुरु केली. तसेच महिलांसाठी विविध योजनांची घोषणा केली. महिलांना बस प्रवासात सवलत. अंगणवाडी सेविका व आशा सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे.

तीसरे अमृत म्हणजे, 'भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास', यामाध्यातून मोठ्या प्रणात प्रकल्पांना निधी शिंदे-फडणवीस सरकारने मंजूर केली आहे. पुणे रिंगरोड, मुंबई-पुणे मिसिंग लिंक, आदिवासी पाडे, बंजारा-तांडे, धनगर वाड्या-वस्त्यांतील रस्त्यांसाठी ४००० कोंटी तरतूद. मेट्रोल प्रकल्प, विमानतळांचा विकास अशा प्रकल्पांवर भर देण्यात आला आहे.

चौथे अमृत म्हणजे, 'रोजगारनिर्मीती, सक्षण, कुशल रोजगारक्षण युवा', लॉजिस्टिक पार्क धोरण, स्टार्टअपसाठी प्रशिक्षण-संशोधन संस्था, विद्यार्थांना आता मिळणार भरीव शिष्यवृत्ती, शिक्षणसेवकांच्या माधनात मोठी वाढ, शैक्षणिक संस्थासाठी ५०० कोटी रुपयांचे अनुदान. खेळांना प्रोत्साहनासाठी विविध योजना मांडल्या आहेत.

Devendra Fadnavis News
Ajit Pawar on Budget: अर्रर्र...! अजितदादांची 'ती' अॅक्शन कॅमेऱ्यात कैद

पाचव्या अमृतामध्ये फडणवीस यांनी, 'पर्यावरणपूरक विकास विभागांसाठी तरतूद', यामध्ये राज्याचे नेट झिरो उत्सर्जन करण्यासाठी उपाययोजना, २० हजार ग्रामपंचायतीत सौर अर्जा प्रकल्प, शिवसेनेरी जुन्नर येथील बिबट सफारी, पर्यावरण पुरक विकास, अशा विविध धोषणा फडणवीस यांनी अर्थ संकल्पात सादर केल्या आहेत.

या पंचामृतांच्या माध्यमातून फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. त्यामुळे येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सर्व क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा केल्या. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून फडणवीस यांनी राज्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींवर पडदा टाकत, शिंदे सरकारची कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in