भाजपचे माजी आमदार पुन्हा वादाच्या भोवऱ्यात.. - Filed a case against former BJP MLA Mehta | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपचे माजी आमदार पुन्हा वादाच्या भोवऱ्यात..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

माजी आमदार नरेंद्र मेहता हे आपल्या कार्यकर्त्याना घेऊन पोहचले आणि जमिनीवर असलेले श्याम सुंदर अग्रवाल यांचे पोस्टर फाडले.  सुरक्षारक्षकांना मेहता यांच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करत शिवीगाळ केली.

भाईंदर : भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर बेकायदा जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भाईंदर पश्चिम तोदी वाडी येथील बिल्डर श्याम सुंदर अग्रवाल यांच्या मालकी जमिनीवर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता माजी आमदार नरेंद्र मेहता हे आपल्या कार्यकर्त्याना घेऊन पोहचले आणि जमिनीवर असलेले श्याम सुंदर अग्रवाल यांचे पोस्टर फाडले तसेच जागेवर असलेल्या सुरक्षारक्षक यांना मेहता यांच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. आणि जमीन खाली करा, असे म्हणाल्याची तक्रार अग्रवाल यांनी केल्यानंतर मेहता यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्याच प्रमाणे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त हि ठेवण्यात आला होता. 

भाईंदरचे माजी आमदार हे गेल्या काही दिवसापासून कोणत्या ना कोणत्या कारणांनी अडचणीत येत असतात. यापूर्वी त्यांच्यावर ऑक्ट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला असून त्याशिवाय इतर गुन्हे हि दाखल झले आहेत. मीरा भाईंदरमध्ये त्यांची ओळख माजी मुख्यमंत्र्यांचे जवळचे असा करण्यात येत आहे तर मेहता यांनी पालिकेवर एकहाती सत्ता आणल्याने पक्षातील त्यांचे वजन चांगलेच वाढले होते.  

पक्षाच्या नगरसेविका असलेल्या गीता जैन यांनी त्यांच्या विरोधात विधानसभेच्या वेळी बंड करून त्यांचा प्रभाव केला होता. यातच काल पुन्हा एकदा ते जमिनीच्या व्यवहारात अडचणीत आले आहेत. जमीन मालक श्यामसुंदर अग्रवाल विकसक (बिल्डर) यांच्या तक्रारी वरून मंगळवारी रात्री भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता, माजी नगरसेवक तथा स्थायी समिती सभापती प्रशांत केळुसकर आणि मेहतांचे यांचे निकटवर्तीय संजय थरथरे आणि इतर 35- 40 जण यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास भाईंदर पोलीस करत आहेत.

Edited  by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख