पत्नीला काही कळू न देताच सासऱ्यांच्या घरावर चालवला बुलडोझर! गडकरींचा गौप्यस्फोट

एका रस्त्याच्या कामासाठी त्यांच्या कुटूंबावरच आलेल्या एका संकटाचा गौप्यस्फोट गडकरी यांनी गुरूवारी केला आहे.
Father in laws house was demolished for a road said Nitin Gadkari
Father in laws house was demolished for a road said Nitin Gadkari

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा कामाचा झपाटा सर्वानांच अवाक करतो. कामातील दिरंगाई त्यांना अजिबात चालत नाही. याबाबत ते आपल्या भाषणांमधून सातत्यानं अधिकारी, ठेकेदार, शासकीय यंत्रणांची कानउघडणी करत असतात. कामाचा दर्जा आणि ते वेळेत पूर्ण करण्याकडं त्यांचं प्राधान्यानं लक्ष असतं. मग त्यासाठी ती कोणतीही तडजोड करत नसल्याची अनेक उदाहरणं त्यांनीच सांगितली आहेत. (Father in laws house was demolished for a road said Nitin Gadkari)

एका रस्त्याच्या कामासाठी त्यांच्या कुटूंबावरच आलेल्या एका संकटाचा गौप्यस्फोट गडकरी यांनी गुरूवारी केला आहे. 'रामटेकमध्ये असलेले सासऱ्यांचं घर एका रस्त्याच्या कामात येत होतं. पण मागता पुढचा विचार न करता या घरावर बुलडोझर चालवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं रस्त्याचं काम पूर्ण झालं. हे घर पाडताना पत्नीला काहीही सांगितलं नव्हतं,' असं गडकरी यांनी सांगितलं. नेत्यांनीच विकासाच्या कामात अडथळा आणू नये, असं गडकरी यावेळी म्हणाले. 

गडकरी यांनी गुरूवारी हरयाणा येथे दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हा गौप्यस्फोट केला. दरम्यान, हा एक्सप्रेस वे दिल्ली, हरयाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमधून जाणार आहे. देशाची राजधानी आणि देशाच्या आर्थिक राजधानीला जोडणारा हा महामार्ग आहे. दिल्ली ते कटरा या मार्गाचे काम दोन वर्षांत पूर्ण होईल. 

दिल्ली ते कटरा मार्ग खुला झाल्यानंतर हा प्रवास केवळ सहा तासांचा असेल. दिल्ली ते मुंबई एक्सप्रेस वे जगातील सर्वात मोठा एक्सप्रेस वे असेल. या मार्गामुळं दोन शहरांतील प्रवास केवळ 11 तासांवर येणार असून 130 किमी अंतर कमी होणार आहे. दिल्ली चंदीगड, दिल्ली डेहराडून आणि दिल्ली हरिद्वार या नवीन रस्त्यांवरही काम सुरू आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली. 

हरयाणा, मध्यप्रदेश व राजस्थान या राज्यांमध्ये महामार्गाचे काम सुरू झालं आहे. गडकरी यांनी आज तीनही राज्यांमध्ये जाऊन मार्गाच्या कामाची पहाणी केली. काही ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष महामार्गवर जाऊन तर काही ठिकाणी हवाई पाहणी केली. या मार्गाचं काम 2023 पर्यंत पूर्ण कऱण्याचं लक्ष्य आहे. त्यासाठी तब्बल एक लाख कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com