अखेर भाजप सरकार झुकले; शेतकऱ्यांचे बेमुदत आंदोलन मागे

शेतकऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले होते. अखेर सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
farmers call of week long protest in karnal haryana
farmers call of week long protest in karnal haryana

चंडीगड : शेतकऱ्यांवर (Farmers) लाठीहल्ला (Lathicharge) करुन त्यांची डोकी फोडण्याचा आदेश उपजिल्हाधिकारी आयुष सिन्हा (Ayush Sinha) यांनी पोलिसांना (Police) दिला होता. या आदेशानंतर शेतकऱ्यांवर लाठीहल्ला होऊन यात एकाचा मृत्यू  तर काही शेतकऱ्यांची डोकीही फुटली होती. यानंतर शेतकऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले होते. अखेर सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. 

हरयाणा राज्यातील करनाल जिल्ह्यात 28 ऑगस्टला हा प्रकार घडला होता. यानंतर शेतकऱ्यांनी करनाल येथे आंदोलन सुरू केले होते. हरियानातील भाजप सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये आज चर्चा झाली. लाठीहल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या सतीश काजल या शेतकऱ्याच्या कुटुंबातील दोघांनी नोकरी देण्याचे आश्वासन अतिरिक्त मुख्य सचिव देवेंदरसिंह यांनी दिले. काजल यांच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी आणि त्यांच्या मुलाला कंत्राटी नोकरी देण्यात येणार आहे. यानंतर शेतकरी नेत्यांनी बेमुदत आंदोलन मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.   

दरम्यान, सिन्हा यांच्यावर कारवाई करावी, या मागणीवर शेतकरी ठाम होते. सरकारनेही सिन्हा यांची पाठराखण करण्याची भूमिका सुरवातीला घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण होते. अखेर सरकार शेतकऱ्यांसमोर झुकले. सरकारने सिन्हा यांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत महिनाभरात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या काळात सिन्हा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. यानंतर अखेर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. 

कृषी कायद्यांविरोधात 28 ऑगस्टला शेतकऱ्यांनी भाजप नेत्यांविरोधात आंदोलन केले. या आंदोलनावर पोलिसांनी लाठीहल्ला केला. अनेक शेतकऱ्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर लाठ्या चालवण्यात आल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू तर किमान 10 शेतकरी गंभीररीत्या जखमी झाले होते. यामुळे शेतकरी आणि सरकारमधील संघर्ष आणखी चिघळला आहे. नंतर सिन्हा यांनीच लाठीहल्ल्याचे आदेश दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. 

काय म्हणाले होते आयुष सिन्हा?
आयुष सिन्हा पोलिसांना आदेश देताना त्यांच्या मागून हा व्हिडीओ घेण्यात आला आहे. ते म्हणतात, कोणीही शेतकरी बॅरिकेड पार करता कामा नये. सगळं स्पष्ट आहे. कुणी कुठूनही असो, त्याच्यापुढे जाऊ देऊ नका. जर कुणी जात असेल तर काठीने डोकं फोडा. कोणत्याही आदेशाची गरज नाही. पकडून-पकडून मारा. कोणत्याही परिस्थितीत सुरक्षा टिकली पाहिजे. आपल्याकडे अतिरिक्त फोर्स आहे. तुम्ही हेल्मेट घाला. आम्ही पूर्ण रात्र झोपलो नाही. दोन दिवसांपासून ड्यूटी करतोय. सर्व काही स्पष्ट काही ना? इथून पुढे कुणी गेलं तर त्याचं डोकं फुटलेलं दिसायला हवं, असं सिन्हा म्हणत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com