अखेर 'ते' आयएएस अधिकारी सक्तीच्या रजेवर; निवृत्त न्यायाधीशांमार्फत होणार चौकशी

या आयएएस अधिकाऱ्याला एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून, त्याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी होणार आहे.
अखेर 'ते' आयएएस अधिकारी सक्तीच्या रजेवर; निवृत्त न्यायाधीशांमार्फत होणार चौकशी
farmers call off protest in karnal after government accepted demand

चंडीगड : शेतकऱ्यांवर (Farmers) लाठीहल्ला (Lathicharge) करुन त्यांची डोकी फोडण्याचा आदेश उपजिल्हाधिकारी आयुष सिन्हा (Ayush Sinha) यांनी पोलिसांना (Police) दिला होता. या आदेशानंतर शेतकऱ्यांवर लाठीहल्ला होऊन यात एकाचा मृत्यू  तर काही शेतकऱ्यांची डोकीही फुटली होती. या आयएएस अधिकाऱ्याला (IAS Officer) एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून, त्याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी होणार आहे. यानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. 

हरयाणा राज्यातील करनाल जिल्ह्यात 28 ऑगस्टला हा प्रकार घडला होता. उपजिल्हाधिकारी आयुष्य सिन्हा यांचा या आदेशाबाबतचा व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. भाजपचे खासदार वरूण गांधी यांनीही या व्हिडीओ ट्विट करून संताप व्यक्त केला होता. तसेच, सोशल मीडियावर सिन्हा यांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर झाला होता आणि तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यानंतर शेतकऱ्यांनी करनाल येथे आंदोलन सुरू केले होते. 

शेतकरी आणि प्रशासनामध्ये अनेक वेळा चर्चा झाली होती. परंतु, सिन्हा यांच्यावर कारवाई करावी, या मागणीवर शेतकरी ठाम होते. यामुळे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच होते. सरकारनेही सिन्हा यांची पाठराखण करण्याची भूमिका सुरवातीला घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण होते. अखेर सरकार शेतकऱ्यांसमोर झुकले. सरकारने सिन्हा यांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत महिनाभरात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या काळात सिन्हा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. यानंतर अखेर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. 

कृषी कायद्यांविरोधात 28 ऑगस्टला शेतकऱ्यांनी भाजप नेत्यांविरोधात आंदोलन केले. या आंदोलनावर पोलिसांनी लाठीहल्ला केला. अनेक शेतकऱ्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर लाठ्या चालवण्यात आल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू तर किमान 10 शेतकरी गंभीररीत्या जखमी झाले होते. यामुळे शेतकरी आणि सरकारमधील संघर्ष आणखी चिघळला आहे. नंतर सिन्हा यांनीच लाठीहल्ल्याचे आदेश दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. 

काय म्हणाले होते आयुष सिन्हा?
आयुष सिन्हा पोलिसांना आदेश देताना त्यांच्या मागून हा व्हिडीओ घेण्यात आला आहे. ते म्हणतात, कोणीही शेतकरी बॅरिकेड पार करता कामा नये. सगळं स्पष्ट आहे. कुणी कुठूनही असो, त्याच्यापुढे जाऊ देऊ नका. जर कुणी जात असेल तर काठीने डोकं फोडा. कोणत्याही आदेशाची गरज नाही. पकडून-पकडून मारा. कोणत्याही परिस्थितीत सुरक्षा टिकली पाहिजे. आपल्याकडे अतिरिक्त फोर्स आहे. तुम्ही हेल्मेट घाला. आम्ही पूर्ण रात्र झोपलो नाही. दोन दिवसांपासून ड्यूटी करतोय. सर्व काही स्पष्ट काही ना? इथून पुढे कुणी गेलं तर त्याचं डोकं फुटलेलं दिसायला हवं, असं सिन्हा म्हणत आहेत.

Related Stories

No stories found.