लातूर बाजार सभापतींच्या विरोधात शेतकरी आक्रमक - Farmers aggressive against Latur market speakers | Politics Marathi News - Sarkarnama

लातूर बाजार सभापतींच्या विरोधात शेतकरी आक्रमक

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

बाजार समितीचे सभापती ललितकुमार शहा यांनी शेतकऱ्यांना अरेरावीची व उर्मटपणाची भाषा वापरली आहे.

लातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ललितकुमार शहा यांनी शेतकऱ्यांना अरेरावीची व उर्मटपणाची भाषा वापरली आहे. यापुढे, मला शेतकऱ्यांनी फोन करू नये, असे अपमानास्पद बोलल्याने आज शेतकरी व व्यापारी आक्रमक झाले आहेत. त्यांनी सकाळीच आंदोलन सुरु केले आहे  

ता. २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता शेतकरी विक्रम झामरे यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती संचलित भाजी मंडई मध्ये खूप चिखल झाला आहे. शेतकऱ्यांनी शेतामध्ये कष्ट करून पिकवून आणलेला भाजीपाला विक्रीसाठी नीट घेऊन बसता ही येत नाही. भरपूर चिखल आणि घाण झाली असल्यामुळे  याठिकाणी तातडीने मुरूम टाकण्यात यावा, या मागणीसाठी फोन केला होता. 

ललितकुमार शहा यांनी माझा वर्षभरातला अत्यंत महत्त्वाचा सण असून आज माझे मौनव्रत आहे तुम्ही फोन करून माझे मौनव्रत तोडले. तुम्हाला मार्केट कमिटीच्या सचिवाला भेटता येत नाही का ? मला कशासाठी फोन करून त्रास देत आहात. कोण शेतकरी फितकरी मला माहित नाही यापुढे मला शेतकऱ्यांनी फोन करायचा नाही. भाजीपाला चिखलात फेकून द्या नाहीतर कलेक्टर च्या दारात नेऊन टाका. मला त्याच्याशी काही देणेघेणे नाही. अशी उर्मट भाषा करून शेतकऱ्यांचा अवमान केला होता.

सभापतीनी केलेला हा प्रकार निंदणीय आहे. शेतकऱ्यांविषयी जी भाषा वापरली ती निंदणीय आहे. आम्ही शेतात भाजीपाला पिकतो. त्याला खर्च काय होतो, हे  शेतकऱ्यांना माहित आहे. सभापती म्हणाले की तुमचा माल जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात टाकून द्या, ते तुमच्या मालाची विल्हेवाट लावतील. जिल्हाधिकारीकडं माझी तक्रार करा, त्यांच्यात दम असेल तर मला हटवून दाखवा, असे उत्तर त्यांनी दिल्याचं शेतकऱ्यांना सांगितलं आहे.  
 

हेही वाचा : नगर झेडपीत अर्सेनिक गोळ्यांवर २.५ कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव

नगर : १३ व्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी, त्यावरील व्याज आणि १४ व्या वित्त आयोगावरील व्याज मिळून नगर जिल्हा परिषदेला राष्ट्रीय स्वराज अभियानासाठी २२ कोटी रुपये मिळाले. त्यापैकी २.५ कोटी रुपये जिल्हापरिषदेने अर्सेनिक अल्बम ३० च्या औषधांवर खर्च करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर ठेवला आहे. या औषधांवर इतकी मोठी रक्कम खर्च करणे संयुक्तिक आहे का? शिवाय उर्वरीत १९.५ कोटी निधीचे काय? असा प्रश्न जिल्हा परिषद सदस्य आणि भाजपाचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी केला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख