#Facebook controversy : थरूर यांना रोखण्यासाठी भाजपचा हा आहे प्लॅन बी..   - #Facebook controversy: This is BJP's plan B to stop Tharoor. | Politics Marathi News - Sarkarnama

#Facebook controversy : थरूर यांना रोखण्यासाठी भाजपचा हा आहे प्लॅन बी..  

सरकारनामा ब्युरो
रविवार, 23 ऑगस्ट 2020

खासदार शशी थरूर यांनी फेसबुकच्या प्रतिनिधींना नोटिस पाठवून 2 सप्टेंबरला बैठकीसाठी बोलविले आहे.

नवी दिल्ली : देशात निर्माण झालेल्या फेसबूक वादाबाबत काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांना माहिती तंत्रज्ञान (आयटी) संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून हटविण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर थरूर यांनी भाजप खासदाराच्या विरोधात विशेषाधिकार नोटिस दिल्यानंतर थरूर यांच्या पुढील कारवाई रोखण्यासाठी भाजपने दोन योजना तयार केल्या आहेत. यातील पहिली योजना सध्या कार्यरत आहे. माहिती तंत्रज्ञान (आयटी) संसदीय स्थायी समितीच्या प्रतिनिधींची याबाबत 2 सप्टेंबर रोजी बैठक आहे. यासाठी भाजप आता थरूर यांना रोखण्यासाठी आक्रमक झाली आहे. 
 
भाजपच्या प्लॅन अ मध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना थरूर यांना थांबवावे लागणार आहे. थरूर यांनी समितीमधीत फेसबुकच्या प्रतिनिधींना नोटिस पाठवून 2 सप्टेंबरला बैठकीसाठी बोलविले आहे. दरम्यान भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना पत्र पाठविले आहे. यात समितीच्या अध्यक्षपदावरून थऱूर यांना हटविण्याची मागणी केली आहे. 

थऱूर यांना हटवून त्याजागी दुसऱ्या सदस्याची निवड करावी, असे दुबे यांनी पत्रात म्हटले आहे. थऱूर हे चुकीच्या पद्धतीने समितीत काम करीत आहे. ते आपला राजकीय अजेंडा राबवित आहेत. थऱून हे अफवा पसरवून माझ्या पक्षाला बदनाम करीत आहे, असे दुबे यांनी म्हटले आहे.  भाजपचा हा प्लॅन अ जर अयशस्वी झाला तर भाजपचा प्लॅन ब तयार आहे.

यात 1 सप्टेंबर रोजी भाजप ही समिती रद्द करून नवीन समिती तयार करेल. कारण 2 सप्टेंबरला फेसबूकच्या प्रतिनिधींना सांयकाळी 4.30 वाजेपर्यंत समितीच्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी जाणार आहेत. या विषयावर समितीच्या नियमानुसार समितीच्या कुठल्याही सदस्याला समितीतील गैरप्रकारावर प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार आहे. त्यावर ते मतदान करू शकतात. 

समितीमध्ये 21 लोकसभा सदस्य आहेत. यात भाजपचे 12 आणि एक सहयोगी सदस्य आहे. यात 10 राज्यसभेतील सदस्य आहेत. यापैकी एका सदस्याचं निधन झालं आहे. या नऊ सदस्यापैकी भाजपचे तीन सदस्य आहेत. तर अन्य एका सदस्याचे मत भाजपच्या पारड्यात पडेलं अशी अपेक्षा भाजपला आहे.

संबंधित लेख