सीबीआयची एंट्री अन् गृहमंत्र्यांची विकेट पडणार! परमबीरसिंह यांच्या निकटवर्तीयाला मार्चमध्येच माहिती - ex mumbai cp parambir singh aid predicted anil deshmukh arrest in march-sj84 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

सीबीआयची एंट्री अन् गृहमंत्र्यांची विकेट पडणार! परमबीरसिंह यांच्या निकटवर्तीयाला मार्चमध्येच माहिती

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 23 जुलै 2021

व्यापारी संजय पुनमिया हा परमबीरसिंह यांच्या जवळचा असून, त्याने मार्चमध्ये केलेल्या भविष्यवाणीची आता मोठी चर्चा होऊ लागली आहे. 

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Ex Mumbai CP Parambirsingh)  यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असून त्यांच्याविरोधात आता खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अटक झालेला व्यापारी संजय पुनामिया (Sanjay Punamia) हा परमबीरसिंह यांच्या जवळचा असून, त्याने मार्चमध्ये केलेली भविष्यवाणी समोर आल्याने खळबळ उडाली आहे. 

ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांनी आपल्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी परमबीर सिंग व अधिकाऱ्यांनी खंडणी मागितल्याची तक्रार मरीन ड्राइव्ह पोलिसांकडे केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून परमबीरसिंह, उपायुक्त अकबर पठाण, श्रीकांत शिंदे, पोलिस निरीक्षक आशा कोकरे, पोलिस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, संजय पाटील यांच्यासह सुनील जैन आणि संजय पुनामिया या व्यापाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा : प्रदेशाध्यक्षांच्या पदग्रहणासाठी जात असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर काळाचा घाला 

पुनामिया हा परमबीरसिंह यांच्या जवळचा असल्याचे मानले जाते. खंडणी प्रकरणातील तक्रारदार अग्रवाल आणि आरोपी पुनमिया हे दोघे भागीदार होते. या दोघांमधील वाद मिटवण्यासाठी यावर्षी मार्च महिन्यात एक बैठक झाली होती. सुमारे साडेतीन चाललेली ही बैठक अग्रवाल यांनी टेप केली होती. तीच आता या तक्रारीचा आधार आहे. पुनामियाने त्यावेळी म्हटले होते की, ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली आहे. महाराष्ट्रातील मंत्र्याची विकेट पाडण्यास सांगितले असून, त्यानंतर केंद्रीय यंत्रणा मुंबईत येऊन तपास सुरू करतील. 

पुनामियाच्या संभाषणाचे रेकॉर्डिंग पोलिसांकडे सादर करण्यात आले आहे. पेन ड्राईव्हमध्ये तीन आणि दोन तासांचे संभाषण सादर करण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक झाल्याने परमबीरसिंहांनाही अटक होऊ शकते. आधी दाखल झालेल्या गुन्ह्यांत अटकेपासून बचाव करण्यात परमबीरसिंग यांना यश आले आहे. या गुन्ह्यात मात्र त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, असे सांगण्यात येते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख