पीपीई कीटच्या प्रत्येक बॅचची तपासणी केली जाईल : राजेश टोपे - Every batch of PPE insects will be inspected : Rajesh Tope | Politics Marathi News - Sarkarnama

पीपीई कीटच्या प्रत्येक बॅचची तपासणी केली जाईल : राजेश टोपे

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

जी.जी.सी कंपनीची चैाकशी करण्यात येत आहे. दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. 

मुंबई : "जी.सी.सी. या पीपीई कीट तयार करणाऱ्या कंपनीने अयोग्य पद्धतीने कीट तयार केल्याचं एनआयव्ही संस्थेने दिलेल्या अहवालात स्पष्ट झालं आहे. जी.सी.सी. कंपनीच्या कीट या असमाधानकारक आहेत. यापुढे अशा गोष्टीला आळा बसण्यासाठी पीपीई कीटच्या प्रत्येक बॅचची तपासणी केली जाईल," अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना दिली.

जी.सी.सी.ने तयार केलेल्या पीपीई कीट चार ते पाच जिल्ह्यात थोड्या प्रमाणात वापरण्यात आल्या आहेत. त्या अयोग्य असल्याने परत मागविण्यात आला आहेत. इतर ठिकाणी त्या पाठविण्यात आल्या नव्हत्या. त्या चार ते पाच ठिकाणी योग्य पीपीटी किटचा पुरवठा कऱण्यात येणार आहे. जी.जी.सी कंपनीची चैाकशी करण्यात येत आहे. दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. 

राजेश टोपे म्हणाले की असे प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत एनआयव्ही, आरोग्य, सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असेल. कुठल्याही परिस्थितीत अशी घटना होणार नाही याबाबत काळजी घेण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे. 

हेही वाचा :'जलयुक्त'मध्ये पाणी मुरले की पैसे हे स्पष्ट होईल...
 
मुंबई :जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. या पार्श्वभूमीवर काल विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी टीका केली होती. आता आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाना साधला आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांनी टि्वट केलं होतं. ते आपल्या टि्वटमध्ये म्हणतात जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकारचे आभार. या चौकशीतून ही खरंच जलयुक्त योजना होती की या योजनेत पाण्याऐवजी फक्त पैसेच मुरले हे स्पष्ट होईल.

ग्रामीण भागासाठी क्रांतिकारी योजना असल्याचा मागील भाजप सरकारने गाजावाजा केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा फुगा कॅगच्या अहवालाने फुटला.तब्बल ९६३३ कोटी रूपये खर्चूनही भूजलपातळीत वाढ झाली नसेल तर हे पैसे कुठं मुरले व कुणाची पातळी उंचावली याचा तपास झाला पाहिजे, असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे. जलयुक्त शिवारची चौकशी म्हणजे ही योजना बदनाम करून खानदेश विदर्भ मराठवाड्याचा निधी इतरत्र वळविण्याचा डाव आहे. योजनेची चौकशी जरूर करा, पण यानिमित्ताने विदर्भ मराठवाड्याचा निधी इतरत्र वळवू नका, अशी टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख