मुख्यमंत्र्यांनी दारूबंदीची शपथ घेतली अन् 24 तासांतच विधानसभेत बाटल्यांचा खच!

विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनामाच्या जोरदार मागणी केली आहे.
Bihar assembly
Bihar assembly Sarkarnama

पाटणा : मागील काही वर्षांपासून बिहारमध्ये दारूबंदी (Bihar liquor Ban) आहे. पण अनेक ठिकाणी छुप्या पध्दतीने दारुची विक्री होत असल्याचे अनेकदा आढळून आले आहे. विषारी दारू पिऊन काही जणांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या तर सतत येत असतात. त्यातच आता थेट बिहार विधानसभेच्या आवारात दारूच्या रिकाम्या बाटल्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या घटनेच्या आदल्यादिवशीच मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळाने दारूबंदीची शपथ घेतली आहे.

मुख्यमंत्री नीतिश कुमार (CM Nitish Kumar) यांच्यासह एनडीएच्या सर्व आमदारांनी सोमवारी विधानसभेत राज्यात दारूबंदीची शपथ घेतली. सध्या विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने परिसरातील वर्दळही वाढली आहे. त्यातच मंगळवारी विधानसभेच्या पार्किंगमध्येच दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. यावरून आता मुख्यमंत्री अडचणीत आले आहेत. विरोधकांनी नीतिश कुमार यांना घेरत राजीनाम्याची मागणी केली आहे.

Bihar assembly
धक्कादायक : दोन कोरोना रुग्णांचे मृतदेह तब्बल 15 महिन्यांनी सापडले शवागारात

विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी रिकाम्या बाटल्यांचा व्हिडीओ ट्विट करत सरकारवर टीका केली आहे. बिहार विधानसभेच्या आवारात दारूच्या बाटल्या सापडणे, हे अद्भूत आहे. सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या चेंबरच्या केवळ काही पावलांवर या बाटल्या सापडल्या आहे. कडक सुरक्षा व्यवस्थेत विधानसभेत दारू मिळत आहे. मग उर्वरित बिहारची कल्पनाच केलेली बरी, अशी टीका यादव यांनी केली आहे.

नीतिश कुमार यांनी हे गंभीर असल्याचे सांगत चौकशीचे आदेश दिले. ते म्हणाले, हा खूप गंभीर प्रकार आहे. त्यामुळे याची चौकशी केली जाईल. विधानसभा अध्यक्षांनी परवानगी दिल्यास मुख्य सचिव व पोलीस महासंचालकांमार्फत चौकशी केली जाईल, असे नीतिश कुमार यांनी सांगितले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सर्व सत्ताधारी आमदारांनी शपथ घेतल्यानंतर हा प्रकार समोर आल्याने सरकारला बँकफूटवर गेलं आहे.

राज्यात लिकर माफियांवर नियंत्रण मिळवण्यात नीतिश कुमार यांना अपयश आल्याची टीका प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने केली आहे. दारूबंदी हे तर केवळ दिवास्वप्न असल्याचे यादव म्हणाले. नीतिश कुमार यांचे पोलीस ग्राहकांना अटक करत आहेत. पण खरे गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. गावांमधील गरीब लोक दारू पिऊन मरत आहेत किंवा त्यांना अटक केली जात आहे, असं टीकास्त्र यादव यांनी सोडलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com