शिवसेनेपाठोपाठ शिंदेही आक्रमक; निलंबन नोटीस, गटनेतेपदासाठी सुप्रीम कोर्टात जाणार

चौधरी यांची निवड बेकायदेशीर असून अजूनही मीच गटनेतेपदी कायम आहे, असा दावा शिंदे यांच्याकडून करण्यात येत आहे.
Eknath Shinde-Uddhav Thackeray
Eknath Shinde-Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : बंडखोर आमदारांच्याविरोधात एकीकडे शिवसेना (shivsena) आक्रमक झालेली असताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटानेही आता माघार नाही तर आरपारची लढाई लढविण्याचे ठरलेले दिसत आहे. विधानसभा उपाध्यक्षांच्या निलंबन नोटिशीविरोधात, तसेच अजय चौधरी यांच्या शिवसेना गटनेतेपदाच्या नियुक्तीला उद्या (ता. २७ जून) सर्वोच्च न्यायालयात आव्हाद देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. (Eknath Shinde will go to the Supreme Court on suspension notice and group leadership)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (ता. २५ जून) शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात बंडखोरांविरोधात कडक कारवाईचे संकेत देण्यात आले होते. त्यानुसार तब्बल १६ बंडखोर आमदारांवर पक्षविरोधी भूमिका घेतल्याच्या कारणावरून (नव्या नियमांनुसार केवळ पक्षादेश डावलून विरोधात मतदान केले म्हणूनच नाही तर पक्षविरोधी भूमिका मांडली तरीही बंडखोर आमदारांवर निलंबनाची कारवाई होऊ शकते, अशी कायद्यात तरतूद आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयानेही बिहारमधील शरद यादव यांच्या प्रकरणात शिक्कामोर्तब केले आहे.) निलंबनाची कारवाई करण्यात यावी, असे पत्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना देण्यात आले आहे. त्यानुसार झिरवळ यांनी बंडखोर आमदारांना आपली बाजू मांडण्यासाठी सोमवारपर्यंत वेळ दिला आहे. त्या निलंबनाच्या नोटिशींविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसाठी केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊल!

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेने त्यांची विधानसभेतील गटनेतेपदावरून तातडीने हकालपट्टी केली आहे. त्यांच्या जागी मुंबईतील आमदार अजय चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. त्याला विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवळ यांनी मान्यता दिली आहे. त्याविरोधात शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. चौधरी यांची निवड बेकायदेशीर असून अजूनही मीच गटनेतेपदी कायम आहे, असा दावा शिंदे यांच्याकडून करण्यात येत आहे. तोही प्रश्न आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
शिवसेनेला मोठा झटका ; राष्ट्रवादीवर आरोप करुन जिल्हाप्रमुखाचा सेनेला 'जय महाराष्ट्र'

शिंदे गटाची गुवाहाटीमध्ये आज दुपारी बैठक होत आहे. त्यात पुढील रणनीतीसंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णयही याचवेळी जाहीर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकींचा धडाका लावल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसैनिक रस्त्यावर उतरतून बंडखोरांचा निषेध करत आहेत, तर संघटनेकडून आठ मंत्र्यांच्या हकालपटीचे संकेत देण्यात आले आहेत, तसेच १६ आमदारांना तातडीने अपात्र करण्याच्या हालचाली वेगात सुरू आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com