खोतांचे गाऱ्हाणे संपायच्या आत विनायक मेेटेंचा `इगो` उफाळला... - Ego of Vinayak Mete has now erupted after the political drama by sadhabhau ended | Politics Marathi News - Sarkarnama

खोतांचे गाऱ्हाणे संपायच्या आत विनायक मेेटेंचा `इगो` उफाळला...

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

भाजपला मराठवाड्यातून एकाच दिवसात दोन कटू बातम्या...

बीड : भाजप आघाडीमधील घटकपक्षांच्या नेत्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला कोंडीत पकडण्यास सुरवात केली आहे. पुणे पदवीधर विधान परिषद मतदारसंघात रयत क्रांती संघटनेचने सदाभाऊ खोत यांनी बंडाचे निशाण म्यान केल्याच्या दुसऱ्याच दिवशी आता मराठवाड्यात शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे यांचाही इगो उफाळून आला आहे.

पदवीधर निवडणुकीवरून विनायक मेटे यांनी आक्रमक होत भाजपला सवाल केले आहेत. मराठवाड्यात भाजप घटक पक्षाला विचारत न घेता निर्णय घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपमधील काही नेत्यांनाचं मराठवाड्याची जागा आणायची नाही, असा खळबळजनक दावा त्यांनी केला. तिकडे सदाभाऊ खोतांना देखील तशी वागणूक आणि इकडं आम्हालाही मिळत असल्याची तक्रार त्यांनी केली. त्यामुळे भाजपनं एकदा स्पष्ट करावं नेमके की त्यांचे काय धोरण आहे, अशी मागणी त्यांनी केली.

मराठवाड्यात आजच माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी पक्षाचा राजीनामा देत ऐन निवडणुकीत पक्षाला अडचणीत आणले. त्या राजीनाम्याच्या बातम्या निवळण्याच्या आधीच मेटेंनी रणशिंग फुंकले. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे सतिश चव्हाण यांच्याविरोधात भाजपचे शिरीश बोराळकर यांच्या लढत होत आहे. भाजपने या निवडणुकीची जबाबदारी माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यावर टाकली आहे. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी या निवडणुकीतून माघार घेतल्याने भाजपला हायसे वाटले. मात्र हा निर्धास्तपणा फार काळ टिकणार नाही, याची काळजी घटकपक्षच घेत लागल्याचे दिसून येत आहे. 

खोतांचे गाऱ्हाणे चंद्रकांतदादांनी असे मिटवले...

चंद्रकांत पाटील, भाजपचे नेते मकरंद देशपांडे,आमदार सुधीर गाडगीळ (साहेब) व नाराज असलेले रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत   यांची बैठकीदरम्यान मनधरणी करण्यास यश आले. त्यामुळे पुणे पदवीधर मतदार संघातून रयत क्रांती संघटनेकडून उमेदवार प्राध्यापक एन.डी चौगुले (सर) यांनी माघार घेत भाजपाला पाठिंबा देत आहे.  भाजपाचे उमेदवार संग्राम संपतराव देशमुख यांचा रयत क्रांती संघटनेकडून ताकतीने प्रचार करून मतदान देणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. 

चंद्रकांत पाटील (दादा) बोलताना म्हणाले की भारतीय जनता पक्षात सदाभाऊ खोत यांना मानाचे स्थान आहे. यापुढील काळात देखील पक्षात आणि सत्तेमध्येही सदाभाऊ यांना सन्मान देण्यात येईल. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे खोत यांच्यावर विशेष प्रेम आहे.

 यावेळी रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक भोसले (पंढरपूर) रयत क्रांती संघटनेचे युवा कार्याध्यक्ष सागर खोत (भाऊ) रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे (सर) रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते लालासो पाटील रयत क्रांती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष सयाजी मोरे रयत क्रांती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सुहास पाटील रयत क्रांती संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष विनायक जाधव रयत क्रांती वाहतूक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बजरंग भोसले रयत क्रांती संघटनेचे सांगली जिल्हा युवा अध्यक्ष किरण उतळे नंदकुमार पाटील, सत्यजित जाधव, रयत क्रांती संघटनेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष अरुण गावडे रयत क्रांती वाहतूक संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष महेश माने रयत क्रांती संघटनेचे तालुका उपाध्यक्ष तानाजी जगताप (नाना) रयत क्रांती संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आकाश राणे, रयत क्रांती संघटनेचे शिरोळ तालुका उपाध्यक्ष अल्ताफ मुल्ला सूरज जगताप यास पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख