एकनाथ खडसे उद्या कुणाची 'सीडी' लावून स्फोट करणार? - ED summons NCP Leader Eknath Khadse to appear in person | Politics Marathi News - Sarkarnama

 एकनाथ खडसे उद्या कुणाची 'सीडी' लावून स्फोट करणार?

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 जुलै 2021

एकनाथ खडसे यांनाही ईडीने गुरूवारी (ता. 8) सकाळी 11 वाजता चौकशीसाठी कार्यालयात बोलावलं आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चैाधरी यांना ईडीने (ED) अटक केली आहे. त्यांना विशेष न्यायालयानं येत्या 12 जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे. त्यानंतर एकनाथ खडसे यांनाही ईडीने गुरूवारी (ता. 8) सकाळी 11 वाजता चौकशीसाठी कार्यालयात बोलावलं आहे. पण त्याआधीच खडसे यांनी पत्रकार परिषदेत बोलावली असल्याने चर्चेला उधाण आले आहे. (ED summons NCP Leader Eknath Khadse to appear in person)

ईडी लावली तर सीडी लावेन म्हणणारे खडसे उद्या कोणता गौप्यस्फोट करणार, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. जावयाला अटक केल्यानंतर ईडीने लगेचच खडसे यांना यांना चौकशीसाठी बोलावले होते. मंगळवारी रात्री ईडीकडून जावई चौधरी यांची कसून चैाकशी केली जात होती. आज सकाळी त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना विशेष न्यायालयात हजर केल्यानंतर 12 तारखेपर्यंत कोठडी देण्यात आली आहे.

हेही वाचा : राजीनामा मागितला नाही, मीच दिला! काही तासांत चुकीची दुरूस्ती

त्यानंतर लगेचच ईडीकडून एकनाथ खडसे यांनाही नोटीस बजावण्यात आली. गुरूवारी सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यात आले आहे. त्यामुळे खडसे यांच्या अडचणी वाढणार आहेत. पण त्याआधीच खडसे यांनी सकाळी 10 वाजता मुंबईतील  राष्ट्रवादीच्या कार्यलयात पत्रकार परिषदेत घेणार आहेत. त्यामुळे यामध्ये ते कोणता गौप्यस्फोट करणार याविषयी उत्सुकता वाढली आहे. 

खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपवर जोरदार टीका केली होती. आपल्यामागे ईडी लावल्यास सीडी लावेन, अशा इशारा त्यांनी दिला होता. राष्ट्रवादी प्रवेश केल्यावर ईडी मागे लागेल, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील त्यांना म्हणाले होते. त्यावर त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन, असे खडसे म्हणाले होते. त्यानंतर दोन महिन्यांतच खडसे यांना ईडीने नोटीस पाठवली होती. आता थेट जावयालाच अटक झाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 

हेही वाचा : बदलाच्या वावटळीत रावसाहेब दानवेंनी मंत्रीपद राखलं

काय आहे प्रकरण?

खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांनी 2016 मध्ये भोसरी येथील जमीन खरेदी केली आहे. मूळ जमीन मालकाकडून ही जमीन 3 कोटी 75 लाख रुपयांना घेण्यात आली.ही जमीन एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या व त्यांच्या मालकीच्या जमिनीचे हे दोघे मालक झाले. याच प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानंतर खडसे यांना महसूल मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.  

खडसे यांनी मात्र जमीन घोटाळ्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार अजूनही मुळ जमीनमालकच या जमिनीचा मालक आहे. त्याने संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला आधीपावेतो घेतलेला नाही. तसेच भूसंपादनाची प्रक्रिया रद्द झाल्याने कुणीही जमी विकत घेऊ शकतो. हे कायदेशीरच आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख