'ईडी'च्या तपासातील '10 गोष्टी' देशमुखांसाठी ठरणार अडचणीच्या! - ed summons former home minister anil deshmukh for interrogation | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

'ईडी'च्या तपासातील '10 गोष्टी' देशमुखांसाठी ठरणार अडचणीच्या!

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 29 जून 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्त वसुली संचालनालयाने समन्स पाठवून आज चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे. 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सक्त वसुली संचालनालयाने (ED) समन्स पाठवून आज चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे देशमुख आज ईडी कार्यालयात उपस्थित राहतील का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ईडीच्या तपासातील 10 महत्वाच्या गोष्टी देशमुखांना अडचणीच्या ठरण्याची शक्यता आहे. 

याआधी २६ जूनला देशमुख यांना चौकशीसाठी ईडीने हजर राहण्यास सांगितले होते. परंतु, चौकशीचे मुद्दे कळाल्यानंतरच उत्तरे देता येतील, अशी भूमिका घेत देशमुखांनी एकप्रकारे ईडीवर कुरघोडी केली होती. आज होणाऱ्या देशमुखांच्या चौकशीतून मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत आहेत. देशमुख यांच्या वकिलाने २६ जूनला ते ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई टळली होती. त्यानंतर २८ जूनला पुन्हा ईडीने समन्स पाठवून 29 जूनला चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

देशमुख यांच्या नागपूर येथील श्री साई शिक्षण संस्थेच्या खात्यावर चार कोटी १८ लाख रुपये जमा झाले होते. ते दिल्लीतील चार कंपन्यांमार्फत जमा झाले होते. या कंपन्या फक्त कागदोपत्री असून पैसे हस्तांतरणासाठी त्याचा वापर होतोय, असे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले. या कंपनीचे मालक असलेल्या जैन बंधूंचा जबाबही नोंदवण्यात आला आहे.

अनिल देशमुखांच्या विरोधातील तपासातील 10 महत्वाच्या गोष्टी  

1) अनिल देशमुखांच्या कुटुंबीयांसह नातेवाईकांशी थेट जोडले गेलेल्या 11 कंपन्या 

2) अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांशी 13 कंपन्यांचा संबध थेट 

3) सर्व कंपन्यामधून गैरव्यवहारातल्या पैशांचा व्यवहार

4) अनिल देशमुख यांच्या बँक खात्यावर आलेले पैसे हे विविध कंपन्याकडे वर्ग  

5) ईडीने नोंदवलेले 10 बारमालकांचे जबाब 

6) बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याचा तळोजा कारागृहात नोंदवलेला जबाब 

7) थेट अनिल देशमुखांच्या संपर्कात असल्याची सचिन वाझेची चौकशीत कबुली 

8) गैरव्यवहारातला पैसा हवालामार्फत श्री साई सेवा संस्थेत जमा 

9) श्री साई सेवा संस्था ट्रस्टवर कुंदन शिंदे हा पदाधिकारी 

10) जैन बंधूंचा ईडीने नोंदवलेला जबाब 

 

हेही वाचा : पुन्हा एकदा ईडीविरुद्ध राष्ट्रवादी...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख