मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडून परमबीर सिंग यांचीही चौकशी - ED to summon Parambir Singh in a money laundering case | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडून परमबीर सिंग यांचीही चौकशी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 जुलै 2021

परमबीर सिंह यांनी देशमुखांवर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केले आहेत.

मुंबई : मुंबई माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचीही मनी लाँर्डिंग प्रकरणात ईडी (ED) कडून चौकशी केली जाणार आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचीही चौकशी सुरू असलेल्या प्रकरणातच परमबीर सिंह यांना ईडीकडून समन्स पाठविले जाणार आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (ED to summon Parambir Singh in a money laundering case)

परमबीर सिंह यांनी देशमुखांवर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केले आहेत. बदली झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात देशमुखांवर हे आरोप केले. बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेमार्फत देशमुखांनी 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश दिल्याचे या पत्रात म्हटलं आहे. सीबीआयने या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून ईडीकडूनही मनी लाँर्डिंगच्या आरोपाखाली देशमुख यांची चौकशी सुरू आहे.

हेही वाचा : पदभार घेताच ज्योतिरादित्य शिंदे यांना उच्च न्यायालयानं दिलं पहिलं काम...

देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे व स्वीय सहायक कुंदन शिंदे यांना या प्रकरणात ईडीकडून अटक कऱण्यात आली आहे. तसेच देशमुख यांनाही तीनवेळा समन्स पाठवण्यात आले आहे. ईडीकडून देशमुख यांच्या मुंबई व नागपूरातील घरांची झाडाझडतीही घेण्यात आली आहे. देशमुख यांनी वय, आजार व कोरोनाचे कारण देत कार्यालयात उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. ऑनलाईन चौकशीसाठी तयार असल्याचे पत्र त्यांनी ईडीला दिले आहे. तसेच ईडीच्या कारवाईविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. 

देशमुख यांच्या भोवतीचा फास आवळत असतानाच आता ईडीकडून लेटरबॅाम्ब टाकणारे परमबीर सिंग यांचीही चौकशी केली जाणार आहे. त्यांना लवकरच समन्स पाठवले जाण्याची शक्यता आहे. मनी लाँर्डिंग प्रकरणात त्यांची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांच्याही अडचणी वाढू शकतात. मुंबई उच्च न्यायालयाने देशमुख प्रकरणाशी संबंधित सर्वांची चौकशी करण्याचे आदेश नुकतेच सीबीआयला दिले आहेत. त्यामुळे सीबीआयकडूनही परमबीर सिंह यांची चौकशी होऊ शकते. 

दरम्यान, अनिल देशुख यांच्या भ्रष्टपद्धतीबाबत आपल्याला बळीचा बकरा बनविला गेले, असा आरोप परमबीरसिंह यांनी पत्रात केला आहे. परमबीरसिंह यांनी लिहिलेल्या आठ पानी पत्रांत गृहमंत्र्यांनी वाझेला बोलावून कसे हफ्ते गोळा करायला सांगितले, हे सविस्तर लिहिले होते. याबाबत झालेल्या बैठकांना गृहमंत्र्यांचे खासगी सचिव संजीव पलांडे हे पण उपस्थित होते, असा उल्लेख परमबीरसिंह यांनी होता.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख