शिवसेनेच्या पाच नेत्यांची सोमय्यांनी उडवलीय झोप!

शिवसेना याला कसे उत्तर देणार, हे आगामी काळात कळेल.
Anil Parab, Bhavana Gawli, Anandrao Adsul
Anil Parab, Bhavana Gawli, Anandrao Adsulsarkarnama

मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांची (ED) ईडीकडे तक्रार केल्यानंतर त्यांच्या अडचणींमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. शिवसेनेचे पाच नेते सध्या ईडीच्या रडारवर आहे. परिवहन मंत्री अनिल परब, खासदार भावना गवळी, खासदार संजय राऊत यांच्या पत्नी, माजी खासदार आनंदराव अडसूळ, आमदार प्रताप सरनाईक असे शिवसेनेचे पाच नेते ईडीच्या कारवाईच्या सावटाखाली आहेत.

त्यातील संजय राऊत यांनी एचडीआयएल प्रकरणी 55 लाख रुपये भरले आहेत. प्रताप सरनाईक यांची आणि त्यांचा मुलगा विहंग याची ईडीने चौकशी केली आहे. उच्च न्यायालयाने त्यांच्यावर कठोर कारवाई करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सरनाईक यांच्यावरील कारवाई तात्पुरती थांबली आहे.

अनिल परब (Anil Parab) आज (ता. २८ सप्टेंबर) चौकशीसाठी ईडी (ED) कार्यालयात दाखल झाले. त्यांची मुंबईतील ईडी कार्यालयात पाच तासांहून अधिक काळ चौकशी सुरु आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना सोमवारी ईडीने समन्स बजावले होते. त्यांना 27 सप्टेंबर रोजीच अटक होणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर ते रुग्णालयात दाखल झाले. त्यामुळे अटकेपासून त्यांचा बचाव झाला. मात्र, रुग्णालयातही ईडीचे अधिकारी उपस्थित आहेत.

आनंदराव अडसूळ यांच्या सीटी बँकेमध्ये कामगार, पेंशनधारक, अशा लोकांची खाती होती. बॅंकेचे जवळपास ९ हजार खातेधारक होते. त्या खातेदारांचे पैसे अवैधरित्या बिल्डरांना वाटण्यात आले. त्यात अडसूळ यांनी २० टक्के कमिशन घेतले. त्यामुळे बँक बुडाली. यामध्ये जवळपास ९८० कोटींचा घोटाळा झाला, असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात दोन वर्षांपूर्वी एफआयआर झाले आहेत. मुख्यमंत्री शिवसेनेचा असल्यामुळे ही चौकशी झाली नाही, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला होता. आता ईडीने या तपासाची सूत्रे आपल्याकडे घेतली आहेत.

Anil Parab, Bhavana Gawli, Anandrao Adsul
पटोलेंच्या इशाऱ्याला देशमुखांकडून केराची टोपली...

दुसरीकडे भावना गवळी यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे. त्यांनाही अटक झाल्याची चर्चा सकाळी माध्यमांमध्ये होते. मात्र गवळी यांच्या कंपनीचे संचालक सईद खान यांना ईडीने आज अटक केली. त्यामुळे गवळी यांनाही ईडी केव्हाही ताब्यात घेऊ शक्ते अशी परिस्थिती आहे. गवळी यांचे वकील इंद्रपाल यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात येत असल्याची माहीत आहे. महिला उत्कर्ष ट्रस्टचे कंपनीत रूपांतर करून गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. ट्रस्टच्या मालकीची ७० कोटींची संपत्ती खासदार गवळींनी त्यांच्या पीएच्या नावावर केली असल्याचा गंभीर आरोपही सोमय्या यांनी केला होता. ईडीने गवळी यांच्या संस्थांवर छापे टाकल्या होत्या. त्यानंतर सईद खान यांना अटक केली आहे.

Anil Parab, Bhavana Gawli, Anandrao Adsul
मोठी बातमी : सॅटलाईट इमेजिंगच्या माध्यमातून होणार प्रभागांची सीमानिश्चिती

खासदार सोमय्या आणि शिवसेना यांचे भांडण गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराबद्दल सोमय्या यांनी आरोप करताना 'मातोश्री' कडेही त्यांनी रोख ठेवला होता. त्यातूनच सेनेने त्यांच्याविरोधात पवित्रा घेत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सोमय्या यांना लोकसभेची उमेदवार मिळू नये, अशी भूमिका घेतली होती. त्या वेळी सेनेचे म्हणणे मान्य झाले. आता मात्र सोमय्या विरुद्ध शिवसेना या राजकीय लढाईचा दुसरा अंक जोरात सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांचे सीआरझेड सीमेतील घराबद्दल सोमय्या यांनी तक्रार केली होती. हे अतिक्रमण नार्वेकर यांना काढावे लागले होते. त्यामुळे सध्या तरी सोमय्या यांनी शिवसेनेच्या काही नेत्यांना जेरीस आणले आहे. शिवसेना याला कसे उत्तर देणार, हे आगामी काळात कळेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com