विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर धडा घेतला अन्...

ई. श्रीधरन यांनी सक्रीय राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय़ घेतला आहे.
E Sreedharan

E Sreedharan

Sarkarnama

तिरूअनंतपुरम : विधासनभा निवडणुकीच्या (Assembly Election) तोंडावर भाजपमध्ये (BJP) प्रवेश करत मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनलेले मेट्रोमॅन ई. श्रीधरन (E Sreedharan) यांनी गुरूवारी सक्रीय राजकारणापासून दूर जात असल्याचे घोषणा केली आहे. त्यामुळे भाजपला धक्का बसला आहे. निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आपण धडा घेतल्याचे श्रीधरन यांनी ही घोषणा करताना सांगितले. तसेच आपण कधीच राजकीय नेता नव्हतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

मी राजकारणात सक्रीय राहणार नसलो तर मी राजकारण सोडणार आहे, असा त्याचा अर्थ होत नाही, अशीही संभ्रम निर्माण करणारी प्रतिक्रिया श्रीधरन यांनी माध्यमांना दिली. मी निवडणूक हरलो त्यावेळी निराश झालो होतो. पण आता त्याला काही अर्थ नाही. आता ती वेळ गेली आहे. मी निवडून आलो असतो तर आमदार झालो असतो. पण मी एकटा काहीच करू शकलो नसतो, असे म्हणत त्यांनी भाजपची सत्ता न आल्याबद्दल खंतही व्यक्त केली.

<div class="paragraphs"><p>E Sreedharan</p></div>
मुख्यमंत्रीपदाचे दावेदार निवडणूक हरले अन् आठ महिन्यांतच सोडलं राजकारण!

माझे वय आता 90 वर्षे आहे. यापुढे राजकारणात काम करणे शक्य नाही. आता राजकारणात कोणतंही स्वप्न नाही. माझ्या भूमीची सेवा करण्यासाठी मला राजकारणाची गरज नाही. मी आधीपासून तीन ट्रस्ट मार्फत हे काम करत आहे, असं सांगत श्रीधरन यांनी सामाजिक कामांत सक्रीय राहणार असल्याचे सांगितले.

<div class="paragraphs"><p>E Sreedharan</p></div>
अखेर गंभीर आरोपांनंतर भाजपच्या नेत्याचा मंत्रिपदाचा राजीनामा

दरम्यान, श्रीधरन राजकारणात आल्यानंतर भाजपच्या अनेक स्थानिक नेत्यांनी श्रीधरन हे भाजपकडून मुख्यमंत्री असतील, अशी घोषणाही करून टाकली होती. पण भाजपकडून याबाबत अधिकृत दुजोरा देण्यात आला नव्हता. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारणात येत असल्याचे श्रीधरन यांनी त्यावेळी म्हटले होते. विधानसभेत मी एकटा काही करू शकत नाही. भाजपला सत्ता द्या, असं आवाहनही त्यांनी मतदारांना केलं होतं.

पण या निवडणुकीत श्रीधरन यांच्या पराभवासह एक जागाही गेली. ई. श्रीधरन पलक्कड मतदारसंघातून विजयी होतील, अशी अपेक्षा भाजपला होती. त्यांनी अखेरच्या फेरीपर्यंत लढत दिली होती. पण 3 हजार 859 मतांनी त्यांचा पराभव झाला. श्रीधरन यांनी मुख्यमंत्री पदाशिवाय ध्येय पूर्ण करता येणार नाहीत, असे वक्तव्यही सुरूवातीला केले होते. पण त्यांच्यासह भाजपही विजयापासून दूर राहिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com