'वंचित'चे बुधवारपासून डफली बजाव आंदोलन... - Duffy Bajaw agitation of 'Vanchit' from Wednesday    | Politics Marathi News - Sarkarnama

  'वंचित'चे बुधवारपासून डफली बजाव आंदोलन...

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

 एसटी सेवा व महानगरातील सार्वजनीक बससेवा सुरू झाल्याच पाहिजे, या प्रमुख मागणीला घेऊन हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 

पुणे : केंद्र व राज्य सरकार लॉकडाउन उठवायला तयार नसून ते काहीही सवलत द्यायला तयार नाहीत, याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यभर डफली वाजवण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनीक बससेवा सुरू झाल्याच पाहिजे, या प्रमुख मागणीला घेऊन हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 

राज्यात एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे, तर दुसरीकडे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. या बससेवा तात्काळ सुरू करण्यात याव्यात या प्रमुख मागणीला घेऊन राज्यातील एसटी डेपो व शहरातील सार्वजनिक बस डेपो समोर दिवसभर डफडे वाजविण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे, अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी राज्यातील बाजार समिती, व्यापारी, रिक्षा, दुकानदार, फेरीवाले, लोहार, न्हावी, चांभार इ. संघटनांना भेटून या आंदोलनात सामील होण्याची विनंती करावी, असेही आवाहन त्यांनी केलं आहे. या आंदोलनानंतर सर्वसामान्य नागरिकांना भेटून त्यांना या आंदोलनाचे महत्व सांगावे शिवाय लॉकडाऊनला विरोध का आहे ?, हेही समजावून सांगावे, असे ही प्रकाश आंबेडकर यांनी शेवटी सांगितले, अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.  

Edited  by : Mangesh Mahale  

हेही वाचा :  कर्नाटक सरकार नरमले : मणगुत्तीत सात दिवसांत शिवपुतळ्याची प्रतिष्ठापना 

निपाणी, हुक्केरी (बेळगाव) : मणगुत्ती (ता. हुक्केरी, जि. बेळगाव) येथे बस स्थानकाजवळ बुधवारी (ता. 5 ऑगस्ट) प्रतिष्ठापना करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शुक्रवारी (ता. 7) रात्री हटविण्यात आला होता. त्यामुळे मणगुत्ती गावासह बेळगावमध्ये तणावपूर्ण वातावरण होते. त्याचे पडसाद कर्नाटकसह महाराष्ट्रातही उमटले. विविध जिल्ह्यांतील शेकडो शिवभक्तांनी रविवारी (ता. 9 ऑगस्ट) मणगुत्तीत एकवटून पुतळ्याची त्याच जागी प्रतिष्ठापना करण्याची मागणी करत आंदोलन केले. अखेर कर्नाटक सरकारने नमते घेतल्याने दुपारी तहसीलदार, पोलिस अधिकारी तसेच मणगुत्ती, बेनकनहोळी व बोळशनट्टी या तिन्ही गावातील पंचाची बैठक झाली. त्यामध्ये येत्या सात दिवसांत कायदेशीर बाबींची पूर्तता करून शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची समारंभपूर्वक प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर कर्नाटक-महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी जल्लोष केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख