डॉ. नरेश त्रेहान म्हणाले, कोरोनापासून वाचण्यासाठी आधी लशीच्या दोन डोसमधील अंतर कमी करा!

देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. यामुळे सरकारने लसीकरणावर भर दिला असला तरी लस टंचाईमुळे यात अडथळे येत आहेत.
dr naresh trehan says india should reduce gap between two doses of covid vaccine
dr naresh trehan says india should reduce gap between two doses of covid vaccine

नवी दिल्ली :  देशात कोरोना (Covid19) संसर्गाची दुसरी लाट आली असून, सरकारने लसीकरणावर (Covid vaccination) भर दिला आहे. परंतु, देशात सध्या लस टंचाई आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोव्हिशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवले आहे. यावर मेदांताचे (Medanta)  अध्यक्ष डॉ. नरेश त्रेहान (Naresh Trehan) यांनी केंद्र सरकारला दोन लशीच्या डोसमधील अंतर कमी करण्याचा सल्ला दिला आहे. 

डॉ. त्रेहान म्हणाले की, ब्रिटनने कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर 12 आठवड्यांपर्यंत वाढवले होते. यानंतर भारतानेही याचे अनुकरण केले. भारतात सापडलेल्या बी.1.617 या कोरोना विषाणूच्या प्रकाराचा प्रादुर्भाव ब्रिटनमध्ये वाढू लागल्यानंतर त्यांनी दोन डोसमधील अंतर पुन्हा 8 आठवड्यांवर आणले. दोन डोसमधील कालावधीत तुम्हाला संसर्ग होऊ नये यासाठी 6 ते 8 आठवडे कालावधी योग्य आहे. आता भारतानेही लशीच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याची आवश्यकता आहे. 

देशातील लस टंचाईबाबत बोलताना डॉ.त्रेहान म्हणाले की, देशातील लस टंचाई जुलै-ऑगस्टपर्यंत कमी होईल. तोपर्यंत अनेक लशी उपलब्ध होतील. डिसेंबरच्या अखेरपर्यंत देशातील 60 कोटी नागरिकांना आपण लशीचे दोन्ही डोस देण्यात यशस्वी होऊ. भारताच्या बाबतीत चांगली बाब म्हणजे आपण लस उत्पादक आहोत. सध्याही दरमहा 7 ते 8 कोटी डोस उपलब्ध होत आहेत. परंतु, ते आणखी वाढायला हवेत. कारण आपली लोकसंख्या मोठी असून, समूह प्रतिकारशक्तीपर्यंत पोचण्यासाठी 60 ते 70 कोटी नागरिकांना लस मिळणे आवश्यक आहे.  

सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. 

सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींनाही लस दिली गेली. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. आता केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ.रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

Edited by Sanjay Jadhav 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com