अमेरिकेचे मुख्य वैद्यकीय सल्लागार म्हणतात, भारतातील कोरोना सुनामी रोखण्यासाठी आता एकच पर्याय

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला असून, जगात सर्वाधिक रुग्ण भारतात सापडू लागले आहेत.
dr anthony fauci says complete lockdown is only option for india
dr anthony fauci says complete lockdown is only option for india

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 4 लाख 1 हजार नवीन रुग्ण सापडले असून, 3 हजार 523 जणांचा मृत्यू झाला आहे. जगात एकाच दिवसात सर्वाधिक कोरोना रुग्ण नोंदवण्याचा विक्रम भारताने नोंदवला आहे. भारतातील ही कोरोना सुनामी रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाउन हाच पर्याय आहे, असा सल्ला अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फॉसी यांनी दिली आहे. 

अमेरिकेतील आघाडीचे वैद्यकील तज्ञ असलेले डॉ. फॉसी यांनी भारतातील कोरोना सुनामी रोखण्यासाठी उपाय सांगितले आहे.  भारताने वेळेआधीच कोरोनावर विजय मिळवल्याचे जाहीर करुन फार मोठी चूक केली, असे सांगून डॉ. फॉसी म्हणाले की, भारतातील कोरोनाची दुसरी लाट कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तातडीने संपूर्ण लॉकडाउन लावण्याची आवश्यकता आहे. याचबरोबर ऑक्सिजन, औषधे आणि पीपीई किटचा पुरेसा पुरवठा होईल याची काळजी घ्यावी. या संकटाची तीव्रता पाहता भारताने जागतिक पातळीवरील तज्ञांची मदत घेऊन उपाययोजना आखाव्यात. 

कोरोना मोठ्या प्रमाणात होणारा प्रसार रोखण्यासाठी तुम्ही एकच करु शकता ते म्हणजे सगळा देश संपूर्णपणे बंद करणे. देश आता तातडीने तात्पुरता बंद करणे हाच एकमेव पर्याय आहे. हा पर्याय दीर्घकालीन परिणाम करणाराही आहे. जेव्ही चीनमध्ये कोरोनाचा पहिल्यांदा प्रसार झाला त्यावेळी त्यांनी संपूर्ण लॉकडाउन लावला होता. लॉकडाउन सहा महिन्यांचा करावा असे नाही. तो तात्पुरत्या स्वरुपाचा करुन संसर्गाची साखळी रोखता येईल, असे डॉ.फॉसी यांनी स्पष्ट केले. 

लॉकडाउनमुळे संसर्गाचा वेग कमी होतो. कोणत्याही देशाला लॉकडाउन लावायला आवडत नाही. परंतु, सहा महिन्यांचा लॉकडाउन लावलल्यानंतर समस्या निर्माण होतात. यासाठी तुम्ही काही आठवड्यांचा लॉकडाउन लावू शकता. याचा मोठा परिणाम संसर्गाची साखळी तुटण्यावर होतो, असे डॉ. फॉसी यांनी सांगितले. 

भारतात 24 तासांत 4 लाख रुग्ण 
देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 कोटी 91 लाख 64 हजार 969 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 11 हजार 853 झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 4 लाख 1 हजार 993 रुग्ण सापडले असून, 3 हजार 523 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com