ट्रम्प यांच्या डोकेदुखीत वाढ... महाभियोगाची तयारी अन् पत्नी मेलानियाही नाराज - donald trump wife melania disappointed by capitol hill riots by trump supporters | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

ट्रम्प यांच्या डोकेदुखीत वाढ... महाभियोगाची तयारी अन् पत्नी मेलानियाही नाराज

वृत्तसंस्था
सोमवार, 11 जानेवारी 2021

कॅपिटॉलवरील हल्ल्यानंतर जगभरातून अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका होत आहे. आता त्यांच्या पत्नीने या प्रकरणी मौन सोडले आहे. 

वॉशिंग्टन : अध्यक्षीय निवडणुकीतील पराभवानंतर अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरील अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव दाखल करण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांनी तयारी पूर्ण केली आहे. यातच ट्रम्प यांची डोकेदुखी आणखी वाढली असून, त्यांच्या पत्नी मेलानिया या नाराज असल्याचे समोर आले आहे.  

यातच ट्रम्प यांची डोकेदुखी आणखी वाढली आहे. त्यांच्या पत्नी मेलानिया या नाराज असल्याचे समोर आले आहे. त्यांनी कॅपिटॉलवरील हल्ल्यानंतर धारणे केलेले मौन अखेर सोडले आहे. त्यांनी म्हटले आहे की, कॅपिटॉलवरील दंगलीमुळे मी अतिशय निराश झाले असून, मला अतिशय दु:ख झाले आहे. हिंसाचार हा कधीही स्वीकारार्ह नाही. यात कोणीही गैरसमज करुन घेऊ नये. आपल्या राष्ट्रीय राजधानीत झालेल्या हिंसाचाराचा मी निषेध करते. 

लोकांनी हिंसाचार सोडून द्यावा. लोकांच्या रंगावर अथवा त्यांच्या राजकीय विचासरणीवर त्यांचे मूल्यमापन करु नये. काही लोक या दु:खद घटनेचा वापर करुन चुकीची माहिती परसवत आहेत. याचबरोबर काही जण व्यक्तिगत आरोप करीत अफवा पसरवत आहेत. माझे पती व मला मागील चार वर्षे संधी देणाऱ्या अमेरिकी नागरिकांचे मी मनापासून आभार मानते, असे मेलानिया यांनी म्हटले आहे.  

ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव दाखल करण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांनी तयारी पूर्ण केली आहे. ट्रम्प यांनी समर्थकांना चिथावणी देऊन कॅपिटॉल इमारतीत अराजकता निर्माण केल्याबद्दल त्यांना जबाबदार ठरविलेच पाहिजे, असे सर्वच सदस्यांचे मत आहे. या प्रस्ताव सादर झाल्यास ट्रम्प यांच्याविरोधातील हा महाभियोगाचा दुसरा प्रस्ताव असेल. 

ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोगाच्या तयारीला वेग आला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांनी महाभियोगाच्या तरतूदीचा वापर करणार असल्याचे जाहीर केले आहे. अमेरिकेच्या लोकप्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांना याबाबत पत्र लिहित पार्श्वभूमी तयार केली आणि त्यांनी राज्यघटनेतील २५ व्या घटनादुरुस्तीचा वापर करण्यासाठी उपाध्यक्ष माइक पेन्स यांना अखेरचा इशाराही दिला आहे. 

मंत्रिमंडळातील बहुतांश सदस्यांची मान्यता असल्यास उपाध्यक्ष हे या घटनादुरुस्ती कलमाचा आधार घेत अध्यक्षांची थेटपणे हकालपट्टी करू शकतात. दंगलीबद्दल ट्रम्प यांच्यावर टीका करणाऱ्या पेन्स यांनी अद्यापपर्यंत या कलमाचा वापर करणे टाळले आहे. ट्रम्प यांच्यावर याआधी अधिकारांचा गैरवापर केल्याचा आणि सदनाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल महाभियोगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. गेल्या वर्षी फेब्रुवारीत तो फेटाळला गेला होता. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख