मेहुल चोकसी तुरूंगाबाहेर; न्यायालयाकडून जामीन मंजूर - Dominica Court grants interim bail to fugitive Mehul Choksi | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

भाजपचे किरीट सोमय्या अखेर महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला रवाना
चरणजीत चन्नी होणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री राज्याचे प्रभारी हरीश रावत यांची घोषणा
गणेशोत्सव विसर्जनामुळे पुण्यात मध्यवर्ती भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद
अंबिका सोनी यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद नाकारले
पुरग्रस्तांसाठी सरकारची महत्वाची घोषणा ; नव्या निकषानुसार मदत

मेहुल चोकसी तुरूंगाबाहेर; न्यायालयाकडून जामीन मंजूर

वृत्तसंस्था
सोमवार, 12 जुलै 2021

डोमिनिका सरकारने चोकसीला अवैध प्रवासी म्हणून घोषित केले आहे.

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅक गैरव्यवहारातील फरार आरोपी मेहुल चोकसीला डोमिनिकाच्या उच्च न्यायालयाने जामीनावर सोडण्याचा आदेश दिला आहे. आरोग्याच्या कारणास्तव अंतरिम जामीन देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने त्याला जामीन दिला तर तो पळून जाईल म्हणून जामीन अर्ज फेटाळला आहे. (Dominica Court grants interim bail to fugitive Mehul Choksi)

चोकसी याने काही दिवसांपूर्वी जामीनासाठी अर्ज केला होता. प्रकृती ठीक नसल्याने उपचारासाठी त्याने ही विनंती केली होती. त्यावर 23 जुलै रोजी सुनावणी होणार होती. पण जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी त्याच्या वकिलामार्फत करण्यात आली होती. त्यानुसार न्यायालयाने त्याची विनंती मान्य करत सुनावणी घेतली व त्याला जामीन मंजूर केला. केवळ एंटिगुआमध्ये उपचार करण्यासाठीच हा जामीन दिल्याचे न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. 

हेही वाचा : गणपती व बुध्दांची मूर्ती घेऊन आले अन् पुजापाठ करूनच मंत्र्यांनी पदभार स्वीकारला

दरम्यान, डोमिनिका सरकारने चोकसीला अवैध प्रवासी म्हणून घोषित केले आहे. एंटिगुआ येथे राहणारा मेहुल चोकसी हा २३ मे रोजी डोमिनिका येथे पोहचला होता. तेव्हा डोमिनिका पोलिसांनी त्याला अटक केली होती. सध्या तो डोमिनिकाच्या कारागृहात आहे. मेहुल चोकशीच्या याचिकेवर सध्या डोमिनिकाच्या न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यावर अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. 

डोमिनिका प्रशासनाने त्याची याचिका रद्द करण्यासाठी न्यायालयात दस्ताऐवज दाखल केले आहे. त्याला भारतात पाठवावे, असे डोमिनिका प्रशासनाने न्यायालयात सांगितले. डोमिनिका सरकारने त्याला अवैध प्रवाशी म्हणून घोषित केल्याने त्याचे भारतात प्रत्यार्पण होणे शक्य असल्याचे समजते. एंटिगुआचे पंतप्रधान गैस्टन ब्राऊन यांनी सांगितले की, मेहुल चोकसीला आमच्याकडे पुन्हा न पाठविता त्याला भारताकडे सोपवा. 

२०१७ मध्ये मेहुल चोकसीने एंटिगुआ आणि बारबुडा येथील नागरिकत्व घेतले आहे. जानेवारी २०१८ पासून मेहुल भारतातून फरार असल्याचे सरकारने घोषित केलं आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी नीरव मोदी सध्या ब्रिटनमध्ये असून त्याच्या प्रत्यार्पणाबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे.  मेहुल चोकसी प्रत्यार्पण प्रकरणात त्याच्या गर्लफ्रेंडबाबतही चर्चा काही दिवसापासून रंगली आहे. यात बारबरा जबरिका हि त्यांची गर्ल फ्रेंड असल्याचे वृत्त काही दिवसापूर्वी आले होते. आता बारबरा जबरिका हीने त्यांच्या नातेसंबधाबाबत स्वतः खुलासा केला आहे.   

"मी अनेक वेळा याबाबत स्पष्ट सांगितले आहे की मी त्याची गर्लफ्रेंड नाही. आमची भेट झाली तेव्हा त्याने मला त्याचे नाव 'राज' असल्याचे सांगितले होते.  माझ्या जवळ स्वतःचा उद्योग - व्यवसाय आहे. मला त्याच्या पैशांची, मदतीची, हॅाटेल बुकिंग, दागिन्यांची गरज नाही," असे बारबरा हीने स्पष्ट केले आहे. मेहुल चोकसी अपहरण प्रकरण खोटे असल्याचेही तिने सांगितले. त्याने मला हिऱ्याचे दागिने दिले होते. ते बनावट होते, असेही तिने सांगितले.

"मेहुल चोकसीच्या गैरव्यवहाराची मला माहिती नाही, मला भारतातील भष्ट्राचारी लोकांबाबतही माहिती नाही. गेल्या आठ दिवसांमध्ये प्रसारमाध्यमांतून मला ही माहिती मिळाली. त्याने मला क्युबा येथे भेटणार असल्याचे सांगितले होते. त्याचा क्युबा येथे जाण्याचा बेत होता. त्यांना डोमिनिका येथ जायचे नव्हते.  एटिंगुआ येथील नागरिकांनाही मेहुल चोकसीच्या पार्श्वभूमीबाबत माहित नाही," असे बारबरा हिने म्हटलं होतं.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख