प्रिय मोदीजी, आमच्या विरोधात तुम्हीच प्रचाराला यायचं हं! निमंत्रक : समस्त द्रमुक उमेदवार परिवार - dmk candidates request narendra modi for campaign for opponent | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

प्रिय मोदीजी, आमच्या विरोधात तुम्हीच प्रचाराला यायचं हं! निमंत्रक : समस्त द्रमुक उमेदवार परिवार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा प्रचार पंतप्रधानांनी करावी, अशी गळ आता द्रमुकचे उमेदवार घालू लागले आहेत. 

चेन्नई : तमिळनाडू विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील वातावरण तापले आहे. आता द्रमुकच्या उमेदवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक अजब विनंती करण्यास सुरवात केली आहे. मोदींनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा प्रचार करावा, असे ते म्हणत आहेत. यामुळे त्यांचे मताधिक्य वाढेल, असा विश्वास द्रमुकच्या उमेदवारांना वाटत आहे. या प्रकाराने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेला द्रमुक आक्रमकपणे रिंगणात उतरला आहे. सत्ताधारी अण्णाद्रमुक आणि भाजपच्या आघाडीला द्रमुक टक्कर देत आहे. आता द्रमुकचे उमेदवार मोदींना सोशल मीडियावरुन जाहीर विनंती करू लागले आहेत. द्रमुकचे उमेदवार कम्बम एन. राधाकृष्णन यांनी ट्विट केले असून, त्यात म्हटले आहे की, प्रिय, पंतप्रधान आपण माझ्या कम्बम मतदारंसघात प्रतिस्पर्धी उमेदवाराचा प्रचार करावा. मी तेथे द्रमुकचा उमेदवार आहे. तुम्ही प्रतिस्पर्धी उमेदवाराचा प्रचार केल्यास माझ्या मताधिक्यात वाढ होईल. 

द्रमुकचे नेते व पाच वेळा आमदार असलेले ई.व्ही.वेलू यांनीही असेच ट्विट केले आहे. त्यांच्या मालमत्तांवर मागील आठवड्यात प्राप्तिकर विभागाने छापे मारले होते. त्यांच्यासाठी खुद्द स्टॅलिन प्रचार करीत आहेत. तरीही त्यांनी ट्विट करुन मोदींना प्रतिस्पर्धी उमेदवाराचा प्रचार करण्याची विनंती केली आहे. मोदींनी प्रचार केल्यास आपले मताधिक्य वाढेल, असा त्यांचा दावा आहे. 

स्टॅलिन यांच्या जावयाच्या घरावर छापे 
निवडणूक चार दिवसांवर आलेली असताना आज द्रमुकचे प्रमुख एम.के.स्टॅलिन यांच्या जावयाच्या घरावर प्राप्तिकर विभागाने छापे मारले. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. 

हेही वाचा : अन् स्टॅलिन म्हणाले, मी एम.के.स्टॅलिन आहे!

प्राप्तिकर विभागाने आज सकाळी चेन्नईत आठ ठिकाणी छापे मारले. यात स्टॅलिन यांची मुलगी सेंथामाराई आणि जावई सबारीसन यांच्याशी निगडित चार ठिकाणी छापे मारण्यात आले. प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, स्टॅलिन यांच्या मुलीच्या तेनायमपेट आणि नीलनगराई येथील घरांवर छापे मारण्यात आले. स्टॅलिन यांचे जावई सबारीसन यांच्याशी निगडित अनेक ठिकाणीही छापे मारण्यात आले. निवडणूक प्रचारासाठी मोठी रोख रक्कम ठेवण्यात आल्याच्या संशयावरुन ही कारवाई करण्यात आली. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख