बंडखोरांच्या मनात चाललयं काय? : एकाच सुरात म्हणतात,``ठाकरेंनी बोलावलं तर..

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर सध्या द्विधा मनःस्थितीत असल्याची चर्चा
Uddhav Thackeray News, Eknath Shinde News, Vidarbha Shivsena News, Nagpur News
Uddhav Thackeray News, Eknath Shinde News, Vidarbha Shivsena News, Nagpur NewsSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड करत ४० आमदार आपल्यासोबत घेत भाजपच्या मदतीने सरकार बनविले. मात्र त्यानंतरही शिंदे गट आणि शिवसेना (Shiv sena) यांच्यातील संघर्ष सुरूच आहे. मात्र एका बाजूला हा संघर्ष सुरु असताना दुसरीकडे शिंदे गट शिवसेनेत जाण्याबाबत अजूनही आशावादी आहे. आम्ही शिवसेना सोडली नसल्याने आम्ही शिवसैनिकच आहोत, असे सांगतानाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सन्मानाने बोलाविल्यास आम्ही मातोश्रीवर परत जाऊ, अशी भूमिका या आमदारांनी घेतली आहे.

शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाच्या विरोधात बोलणाऱ्या भाजप नेत्यांनाही या बंडखोरांनी तंबी दिली आहे. आम्हाला सत्तेचा लोभ नाही. ठाकरेंवर टीका झाली तर आम्ही सत्तेला लाथ मारू, असा इशारा बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी दिला. सुहास कांदे यांनीही आपण सर्व बंडखोरांना घेऊन मातोश्रीवर जाऊ, असे शिर्डीत बोलताना जाहीर केले. माजी गुलाबराव पाटील यांनी ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर बंडखोर टीका करणार नसल्याचा निर्वाळा दिला.

Uddhav Thackeray News, Eknath Shinde News, Vidarbha Shivsena News, Nagpur News
सोमय्यांची बेताल वक्तव्ये थांबवा; अन्यथा सत्तेला लाथ मारु : शिंदे गटाचा भाजपला इशारा

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी तर, उद्धव ठाकरे यांनी बोलाविले तर आम्ही नक्की जाऊ, असे विधान केले आहे. मात्र आजूबाजूच्या काही लोकांना उद्धव ठाकरे यांनी दूर ठेवावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. आमदारांची कामे करण्यासाठी मध्यस्थ आम्हाला उद्धव ठाकरे यांची भेट घडवून देण्याचे आश्वासन द्यायचे. मग आम्ही आमदार कशाला झालो, असा सवालही त्यांनी केला आहे.

आम्ही सध्या भाजपसोबत सत्तेत आलो असून एक नवीन कुटुंब तयार झाले आहे. आता या कुटुंबामधून परत जायचे असेल तर आम्ही एकटे नाही. आम्हाला बोलावताना उद्धव ठाकरे यांना भाजपशीदेखील चर्चा करावी लागेल. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा लागेल, असे केसरकर म्हणाले.

Uddhav Thackeray News, Eknath Shinde News, Vidarbha Shivsena News, Nagpur News
उद्धव ठाकरे यांनी मायावतींना फाॅलो केले : मी माझे म्हणणे सांगणार.. ना प्रश्न, ना उत्तरे!

दीपाली सय्यद या पण आशावादी असून त्यांनी तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थी करावी, असे आवाहन केले आहे. ``शिवसेना तोडून लढण्यापेक्षा जोडून लढली तर शिवसैनिकाला आनंद आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एकत्र करण्यासाठी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थी करावी. उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री शिंदे पंतप्रधान मोदींचा शब्द टाळणार नाहीत, हीच एक आशा आहे, असे त्या म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in