Legislative Council Elections : काँग्रेस, राष्ट्रवादीने डाव टाकला; मात्र, ठाकरेंची पाटी कोरीच राहणार?

Legislative Council Elections News : विधान परिषदेच्या निवडणुकीने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निधाले आहे.
Uddhav Thackeray, Ajit Pawar, Nana Patole
Uddhav Thackeray, Ajit Pawar, Nana PatoleSarkarnama

Legislative Council Elections News : विधान परिषदेच्या निवडणुकीने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निधाले आहे. आता पाच जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक होत आहे. ही निवडणूक ठाकरे गट आणि शिंदे गटासाठी प्रतिष्ठेची आहे.

विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक होणार आहे. नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक होणार आहे. विधान परिषदेच्या पाच सदस्यांची मुदत 7 फेब्रुवारीला संपत आहे. यासाठी 30 जानेवारीला मतदान आणि 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

Uddhav Thackeray, Ajit Pawar, Nana Patole
Ajit Pawar News : बारामतीत अजितदादांना प्रथमच प्रचंड सुरक्षा....; कारण काय?

पाच जागांमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) 1, भाजप 1, काँग्रेस (Congress) 1, शेकाप 1 आणि एका जागेवर अपक्ष आहे. शेकापची जागा काँग्रेस, राष्ट्रवादी पुरस्कृत आहे. नाशिकमधून काँग्रेसचे सुधीर तांबे, अमरावतीमधून भाजपचे (BJP) रणजीत पाटील, औरंगाबादमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे, आणि कोकणातून शेकापचे बाळाराम पाटील व नागपूरमधून नागो गाणार हे 2017 मध्ये विजयी झाले होते.

गेल्या वेळची निवडणूक आणि आताच्या निवडणुकीत मोठा फरक आहे. शिवसेनेत फूट पडल्यामुळे निवडणुकीचेही गणीत बदले आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना आमदाराचे निधन झाल्याने महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) ती जागा ठाकरे गटासाठी सोडली होती. विधान परिषदेच्या निवडणुकीत शिंदे गट भाजपसाठी सर्व पाच जागा सोडून देणार की काही वेगळी भूमिका घेणार हे बघावे लागणार आहे.

शिंदे गट आणि भाजपच जागा वाटपाच सूत्र समोर आलेल नाही. मात्र, महाविकास आघाडीचा फॉर्म्यूला समोर आला आहे. यामध्ये विद्यमान आमदार ज्या पक्षाचे, त्यांना जागा सोडण्याचे सूत्र ठरवण्यात आल्याचे समजते. या सूत्रानुसार जर जागा वाटप झाले तर मग, नाशिक काँग्रेसला, औरंगाबाद राष्ट्रवादीला आणि कोकणची जागा शेकापला जाईल. स्वतः अजित पवारांनीच याबद्दल माहिती दिली आहे.

दुसरीकडे ठाकरे गटाने अमरावती किंवा नागपूरपैकी एखादी जागा मिळावी, यासाठी प्रयत्न सुरु केल्याची माहिती आहे. मात्र, दोन्ही जागांवर काँग्रेसने दावा ठोकला आहे. त्यामुळे सर्वांनी अर्ज भरायचे व अर्ज मागे घेण्याच्या दिवशी शेवटच्या क्षणी जागा कुणाची हे ठरवण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतल्याची माहिती आहे. सद्यस्थितीत महाविकास आघाडीमध्ये दोन्ही जागांवर काँग्रेसचेच पारडे जड आहे. त्यामुळे काँग्रेस हातातील जागा सोडणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Uddhav Thackeray, Ajit Pawar, Nana Patole
Nana Patole बघताहेत विरोधकांच्या उमेदवाराची वाट !

तर दुसरीकडे नागपूरच्या जागेसाठी महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या शिक्षक भारतीने आग्रह धरल्याचे समजते. त्यामुळे पाचपैकी एकही आमदार नसलेल्या ठाकरे गटाची पाठी रिकामीच राहणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपसोबत शिंदेंचेही हात रिकामे राहतील का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अशाच आमदार बच्चू कडू यांनी भाजप आणि शिंदे गटाचे टेन्शन वाढवले आहे. पाचही ठिकाणी उमेदवार उभे करण्याची घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे. तसेच अमरावतीमध्ये त्यांची मोठी ताकद आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला फटका बसू शकतो. आता कडू काय भूमिका घेतात, यावर बरेच गणित अवलंबून असेल. मात्र, ठाकरे आणि शिंदेंना काय मिळणार हा प्रश्नच आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com