प्रणिती शिंदेंची प्रतीक्षा संपणार; अखेर अडीच वर्षांनी मिळणार मंत्रिपद?

आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर जिल्ह्यातील कॉंग्रेसची संपूर्ण मदार आहे.
प्रणिती शिंदेंची प्रतीक्षा संपणार; अखेर अडीच वर्षांनी मिळणार मंत्रिपद?
Praniti Shindesarkarnama

सोलापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोट निवडणुकीत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेसला चांगले यश मिळाले. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने अडीच वर्षांच्या कार्यकाळानंतर मंत्रिमंडळातील नेत्यांची व विभागांचा खांदेपालट होईल, अशी शक्‍यता वरिष्ठ नेत्यांनी वर्तवली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनाही मंत्रिमंडळात संधी मिळेल, असाही अंदाज त्यांनी वर्तविला आहे.

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर जिल्ह्यात भाजपने जम बसविला आहे. त्याला शह देण्यासाठी शिंदे यांना संधी मिळू शकते, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईतील मंत्री कायम राहतील. मात्र, इतर विभागांच्या मंत्र्यांना डच्चू मिळू शकतो, अशीही चर्चा आहे.

Praniti Shinde
राज्यमंत्री अब्दुल सत्तार मतदारसंघातील नगरपंचयात भाजपकडून खेचणार?

सोलापूर जिल्हा हा कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, मोदी लाटेत या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला. तरीही, महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात तिन्ही पक्षाकडून जिल्ह्यातील कोणत्याच नेत्याला संधी मिळाली नाही. जिल्ह्याचा पालकमंत्री राष्ट्रवादीचा आहे. जिल्ह्यात भाजपचे सर्वाधिक आमदार आहेत. कॉंग्रेसच्या हाती त्यादृष्टीने काहीच नाही. आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर जिल्ह्यातील कॉंग्रेसची संपूर्ण मदार आहे. जिल्ह्यात कॉंग्रेसला बळ देऊन आमदारांमध्ये वाढ व्हावी, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता मिळावी म्हणून अडीच वर्षाच्या काळानंतर आमदार प्रणिती शिंदे यांना राज्याच्या मंत्रिमंडळात संधी मिळेल, अशी जोरदार चर्चा आहे.

Praniti Shinde
ठाकरे अन् ममता यांच्यातील बंद दाराआड चर्चेवर भाजप खवळले

दरम्यान, सोलापूर लोकसभा मतदारसंघातून दोनदा पराभव पत्करल्यानंतर सुशिलकुमार शिंदे हे राजकारणापासून दुरावल्याचे चित्र आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदापासून ते केंद्रीय गृहमंत्रीपदापर्यंत मजल मारलेले शिंदे सोलापूर दौऱ्यावर येणार असल्याचे समजताच त्यांच्या 'जनवात्सल्य' बाहेर पदाधिकारी, कार्यकर्त्यांची दिवसभर गर्दी पहायला मिळायची. देशातील सत्ता भाजपकडे गेल्यांनतर आता ते जिल्ह्याच्या राजकारणात फारशे सक्रिय नसल्याने ती गर्दी ओसरल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता कॉंग्रेसची ताकद वाढवून पक्षसंघटन मजबूत करण्याची जबाबदारी प्रणिती शिंदे यांच्यावरच आहे. पक्षासाठी त्यांचे योगदान निश्‍चितपणे मोठे असून त्याची त्यांना निश्‍चितपणे पोहोच पावती मिळेल, असेही पक्षातील एका वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.