Ahmednagar News: खुर्चीवरून मानापमान नाट्य; फडणवीसांची राम शिंदेंना 'खास' ट्रीटमेंट; तर विखे पाटलांना सूचक इशारा

Ram Shinde vs Radhakrishna Vikhe Patil : नगरमध्ये भर कार्यक्रमात फडणवीसांसमोरच मान-अपमान नाट्य; फडणवीसांनी मोठेपणा दाखवत...
Devendra Fadnavis, Ram Shinde, Radhakrishna Vikhe Patil
Devendra Fadnavis, Ram Shinde, Radhakrishna Vikhe PatilSarkarnama

Ahmednagar BJP: महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत राम शिंदेंनी विखेंवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर विखे पाटलांनीही शिंदेंवर निशाणा साधला होता. त्यानंतर नगर भाजपमधील अंतर्गत कलहाची चांगलीच चर्चा रंगली.

असे असतानाच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी राम शिंदे आणि विखे पाटील यांच्यातील वादावर थेट भाष्य केलं. तसेच फडणवीस उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच खुर्चीवरून घडलेल्या मान-अपमान नाट्यानंतर फडणवीसांनी मोठेपणा दाखवत एक 'खास मेसेज' दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Devendra Fadnavis, Ram Shinde, Radhakrishna Vikhe Patil
Ahmednagar Politics: फडणवीसांच्या शेजारच्या खुर्चीवर विखे बसले अन्‌ राम शिंदे व्यासपीठावरून खाली निघाले; पण....

विखे-शिंदे वादावर फडणवीस काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री फडणवीस यांना विखे-शिंदे यांच्यातील वादावर पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, "दोघांना सोबत घेऊन बसलोआहे. समन्वय आहेच. काही काळजी करु नका. काही वाद नाहीत. वाद असले तरी वादळ नाही. चिंता करु नका. चहाच्या पेल्यातील वादळ आता संपलेलं आहे", अशी सूचक प्रतिक्रिया देत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

मात्र, याच दौऱ्यावेळी एका भर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोरच स्टेजवर बसण्याच्या खुर्चीवरून मानापमान नाट्य रंगल्याचं पहायला मिळालं.

Devendra Fadnavis, Ram Shinde, Radhakrishna Vikhe Patil
Ahmednagar Politics: राम शिंदे-विखे पाटील वादावर फडणवीस थेटच बोलले; म्हणाले, वाद असले तरी...

नेमकं काय घडलं?

नगर जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, खासदार उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील हे स्टेजवर शेजारी बसलेले होते. मात्र, भाजप आमदार राम शिंदे यांना स्टेजवर बसण्यासाठी खुर्ची न मिळाल्यामुळे शिंदे स्टेजवरून खाली निघाले.

पण ही गोष्ट फडणवीसांच्या लक्षात येताच त्यांनी लगेच राम शिंदे यांना स्टेजवर बोलावत आपल्या शेजारी खुर्ची देत करत बसण्याची विनंती केली. विशेष म्हणजे फडणवीसांच्या एका बाजूला राधाकृष्ण विखे पाटील तर दुसऱ्या बाजूला राम शिंदे असं चित्र पाहायला मिळालं. या मान-अपमान नाट्याची सध्या जिल्ह्यात एकच चर्चा रंगली. मात्र, फडणवीसांनी राम शिंदेंना दिलेल्या या 'खास' ट्रिटमेंटमुळे विखे पाटलांना एक प्रकारे इशारा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com