अजितदादा म्हणाले, "खडसेंबाबत मला माहित नाही..." - Deputy Chief Minister Ajit Pawar said I don't know about Eknath Khadse | Politics Marathi News - Sarkarnama

अजितदादा म्हणाले, "खडसेंबाबत मला माहित नाही..."

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

अजित पवार म्हणाले, " एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबद्दल मला काही माहिती नाही. " 

पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. याबाबत अनेक तर्क-वितर्क व्यक्त केलं जात आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबद्दल मला काही माहिती नाही. 

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले की एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबद्दल मला काही माहिती नाही. जेवढी माझ्याकडे माहिती होती ती मी तुम्हाला दिली आहे

राजकीय जीवनात अनेकांच्या भेटीगाठी होत असतात. त्यानुसार काही जण मला भेटून गेले. त्यामुळे भेट झाली म्हणजे काही काळंबेरं समजू नये. भाजपचं सरकार असताना आम्हीदेखील लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांना भेटायचो. मी तर सगळ्यांना भेटत असतो, तुम्ही मला कित्येक वर्ष ओळखता, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.  

एकनाथ खडसे समर्थक आमदारांवर नाशिक मध्ये ‘वॉच' ?
  
नाशिक : भाजपचे जेष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चा जोरात आहे. त्यावर भारतीय जनता पक्षात अद्याप प्रतिक्रिया उमटली नाही. मात्र श्री. खडसे यांच्या बरोबर काही आमदार पक्ष सोडणार  असल्याची चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील काही आमदारांवर भाजप कडून ‘वॉच' ठेवला जात असल्याचे बोलले जाते. 

एकनाथ खडसेंनी पक्ष सोडला, तर त्यांच्यासोबर एकही आमदाराने जाऊ नये यासाठी फिल्डींग लावली जात असल्याचे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने खाजगीत सांगितले. राज्यात भाजपची सत्ता असताना एकनाथ खडसे यांच्याकडे मंत्रीमंडळातील दुसया क्रमांकाचे महसुल हे खाते होते. त्याचबरोबर अन्य खाती त्यांच्याकडे असल्याने मुख्यमंत्री झाले नाही, तरी प्रबळ मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. हे त्यांच्या विरोधकांना खटकत होते. त्यातुनच कालांतराने भोसरी भुखंड व्यवहाराच्या निमित्ताने त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

श्री. खडसे यांना भाजप मधून धक्का देण्याचे राजकीय तंत्र एवढ्यावरचं थांबले नाही. विधानपरिषद, विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचे धक्के बसले. जळगाव मधील स्थानिक स्वराज्य संस्थांवरील त्यांची पकड ढीली करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न झाल्याचे खुद्द खडसे यांनी अनेकदा सांगितले. राज्य पातळीवर देखील संघटनेत त्यांना स्थान दिले नाही. त्यामुळे दर दोन, चार महिन्यांनी खडसे नाराजी व्यक्त करतं राहीले. मध्यंतरीच्या काळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाचं त्यांनी लक्ष केले. त्यानंतर खडसे आता पक्ष सोडणार अशी चर्चा सुरु झाली. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख