रुग्णालयातून कोरोना लशीला फुटले पाय; पोलिसांकडून तपास सुरू

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यूचे आकडे आता उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. आता सरकारने लसीकरणावर भर दिला आहे.
covid 19 vaccine doses missing from hopital in rajsthan
covid 19 vaccine doses missing from hopital in rajsthan

पाटणा : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाचा वेग वाढवला आहे. देशात लशीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे लसीकरणात अडचणी निर्माण होत आहेत. आता रुग्णालयातून कोरोनाचे 320 डोस गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रुग्णालयातूनच कोरोना लशीला पाय फुटल्याने पोलिसांनी याचा तपास करण्यास सुरवात केली आहे. 

हा प्रकार राजस्थानमधील जयपूर येथील एच बी कनवातिया रुग्णालयात घडला आहे. रुग्णालयाच्या कोल्ड स्टोरेजमध्ये रविवारी (ता.11) कोरोना लशीचे दोनशे डोस होते. त्यानंतर सोमवारी (ता.12) कोरोना लशीचे आणखी 489 डोस आले. त्यानंतर डोसची मोजणी करण्यात आली. त्यावेळी 320 डोस गायब असल्याचे समोर आले. कोल्ड स्टोरेजच्या बाहेर सुरक्षारक्षक असतानाही डोस गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकरणी रुग्णालयाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गायब डोस तपास सुरू केला आहे. सुरक्षारक्षक असताना डोस गायब होण्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. याचबरोबर तेथील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीही पोलीस करीत आहेत. 

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, मागील 24 तासांत तब्बल 1 लाख 84 हजार कोरोना रुग्ण सापडले आहेत. देशात 7 एप्रिलपासून दररोज लाखाच्या वर नवीन रुग्ण सापडत आहेत.. याचवेळी देशात कोरोना लशीची टंचाई निर्माण झाली आहे. यावरुन केंद्र सरकार आणी काही राज्यांमध्ये जुंपली आहे. अशा परिस्थितीत कोरोना लशीचे डोस गायब होण्याचा प्रकार गंभीर मानला जात आहे.  

देशात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येत आहे. मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागत होते. सरकारने आता ही किंमत कमी करुन 200 रुपयांवर आणली आहे. 

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांनाही लस दिली गेली. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. आता केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ.रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com