अबब..देशातील कोरोना रुग्णसंख्या दोन कोटीवर; जाणून घ्या रुग्णसंख्या वाढीचे टप्पे - covid 19 cases in india crosses 2 crore mark on 4 may | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

अबब..देशातील कोरोना रुग्णसंख्या दोन कोटीवर; जाणून घ्या रुग्णसंख्या वाढीचे टप्पे

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 मे 2021

देशातील कोरोना रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असून, आज रुग्णसंख्येने 2 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.  

नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असून, आज रुग्णसंख्येने 2 कोटींचा टप्पा ओलांडला. (covid 19 cases in india cross 2 crore mark) देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 3 लाख 57 हजार नवीन रुग्ण सापडले असून, 3 हजार 449 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आता दरतासाला सुमारे 143 जणांचा कोरोनामुळे बळी जात आहे. देशात गेल्या वर्षी 7 ऑगस्टला 20 लाखांवर असलेली रुग्णसंख्या आज 2 कोटींवर पोचली आहे. 

देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 2 लाख 82 हजार 833 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 22 हजार 408 झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 3 लाख 57 हजार 229 रुग्ण सापडले आहेत.  मागील 24 तासांत 3 हजार 449 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

सक्रिय रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक 
देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 34 लाखांवर गेली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या दररोज वेगाने वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 34 लाख 47 हजार 133 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 17 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 81.91 टक्के आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 66 लाख 13 हजार 292 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.10 टक्के आहे. 

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे 
20 लाख : 7 ऑगस्ट  (2020) 
30 लाख : 23 ऑगस्ट  
40 लाख : 5 सप्टेंबर  
50 लाख : 16 सप्टेंबर 
60 लाख : 28 सप्टेंबर 
70 लाख : 11 ऑक्टोबर  
80 लाख : 29 ऑक्टोबर  
90 लाख : 20 नोव्हेंबर 
1 कोटी : 19 डिसेंबर 
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)  
2 कोटी : 4 मे 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख