स्मृती इराणींनी नियुक्तीसाठी मागितले पैसे; आंतरराष्ट्रीय नेमबाज तरूणीची न्यायालयात धाव - court to decide territorial jurisdiction of case against union minister Smriti Irani | Politics Marathi News - Sarkarnama

स्मृती इराणींनी नियुक्तीसाठी मागितले पैसे; आंतरराष्ट्रीय नेमबाज तरूणीची न्यायालयात धाव

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

केंद्रीय मंत्री भाजप नेत्या स्मृती इराणी या अडचणीत आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय नेमबाजाने त्यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. 

सुलतानपूर (उत्तर प्रदेश) : केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधात आंतराष्ट्रीय नेमबाज वर्तिकासिंहने न्यायालयात धाव घेतली आहे. स्मृती इराणी आणि त्यांचे सहायक राष्ट्रीय महिला आयोगावरील नियुक्त्यांसाठी पैसे घेत असल्याचा आरोप वर्तिका यांनी केला आहे. या प्रकरणी वर्तिका यांनी पोलीस ठाण्यातही तक्रार केली आहे. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू झाली असून, स्मृती इराणींच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

वर्तिका यांनी या प्रकरणी न्यायालयात खटला दाखल केला आहे. वर्तिका यांनी खासदार आणि आमदारांच्या विरोधात खटला चालवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. यावरील सुनावणी आज झाली आहे. हा गुन्हा कार्यकक्षेत येतो की नाही याबद्दल निर्णय आता पुढील सुनावणीवेळी 6 फेब्रुवारीला निर्णय घेणार आहे, अशी माहिती वर्तिका यांचे वकील रोहित त्रिपाठी यांनी दिली. 

वर्तिका यांनी म्हटले होते की, राष्ट्रीय महिला आयोगावर सदस्य म्हणून नियुक्तीचे पत्र मला स्मृती इराणींच्या निकटवर्ती व्यक्तींनी दिले. विजय गुप्ता आणि रजनीशसिंह अशी त्यांची नावे आहेत. यासाठी त्यांनी माझ्याकडे एक कोटी रुपयांची मागणी केली होती. नंतर ते 25 लाख रुपयांवर कबूल झाले. यातील एकाने माझ्याशी अश्लील भाषेत बोलण्याचाही प्रयत्न केला. नंतर नियुक्तीचे पत्र खोटे असल्याचे निष्पन्न झाले होते. 

दरम्यान, विकास गुप्ता यांनीही 23 नोव्हेंबरला वर्तिका आणि आणखी एका व्यक्तीविरोधात अमेठीतील मुसाफिरखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. प्रतिमा मलिन करण्यासाठी बदनामी सुरू असल्याचा आरोप गुप्ता यांनी केला होता. या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. मात्र, भ्रष्टाचार उघडकीस आणल्याने आपल्याविरोधात खोटी तक्रार दाखल करण्यात आल्याचा दावा वर्तिका यांनी केला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख