PWD चे अधिकारी आमदारांनाच `चुना` लावतात तेव्हा....!

बनावट अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिका आणि बिलांच्या माध्यमातून हा घोटाळा झाला. दरसूचीच्या बाहेर जाऊन वस्तू खरेदी केल्या. कोरे कोटेशन घेऊन अधिकाऱ्यांनी आपल्या इच्छेने दर लिहिले. आमदारांच्या खोलीवर पाच लाखापेक्षा जास्त खर्च होत नसतात दुरुस्ती आणि सजवाटीवर प्रत्येकी 20 ते 25लाख रुपयांचा खर्च 30 आमदारांच्या खोलीवर दाखवण्यात आला.
PWD चे अधिकारी आमदारांनाच `चुना` लावतात तेव्हा....!

नागपूर : मुंबईतील विधानभवन लगतच्या मनोरा या आमदार निवासस्थानातील खोल्यांच्या देखभाल दुरुस्तीत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यावरून शुक्रवारी विधानसभेत वादळी चर्चा झाली. आमदारांच्या खोट्या सह्या करून झालेल्या भ्रष्टाचारात प्रमुख दोषी असलेल्या तत्कालीन कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत याप्रकरणी आमदारांची सर्वपक्षीय चौकाशी समिती नेमण्याची तसेच फौजदारी गुन्हा दाखल मागणी करण्यात आली.

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावर अधीक्षक अभियंत्यांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती दिली. याप्रकरणी दोन अभियंत्यांना निलंबित करण्यात आले आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांच्या विरोधात कारवाई केली जाईल, असे आश्वासन पाटील यांनी दिले. याप्रकरणात एफआयआर दाखल करण्यासाठी सरकारकडे येण्याची गरज नाही. आमदार स्वतंत्रपणे एफआयआर दाखल करू शकतात, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

आज प्रश्नीत्तराचा तास संपल्यानंतर कॉंग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी मनोरा आमदार निवासात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला. अधिकाऱ्यांनी दुरुस्ती न करता खोटी बिले काढून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला. हा गैरव्यवहार गंभीर असून त्याची सर्वपक्षीय आमदारांच्या समितीकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

हा घोटाळा बाहेर काढणारे भाजपचे आमदार चरण वाघमारे यांनी घोटाळ्याची कार्यपद्धती सभागृहाला सांगितली. बनावट अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिका आणि बिलांच्या माध्यमातून हा घोटाळा झाला. दरसूचीच्या बाहेर जाऊन वस्तू खरेदी केल्या. कोरे कोटेशन घेऊन अधिकाऱ्यांनी आपल्या इच्छेने दर लिहिले. आमदारांच्या खोलीवर पाच लाखापेक्षा जास्त खर्च होत नसतात दुरुस्ती आणि सजवाटीवर प्रत्येकी 20 ते 25लाख रुपयांचा खर्च 30 आमदारांच्या खोलीवर दाखवण्यात आला. हा घोटाळा दाबण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार सतीश पाटील यांच्या खोलीत स्लॅबचा तुकडा पाडण्यात आल्याची खळबळजनक माहिती वाघमारे यांनी दिली. या घोटाळ्याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर मोक्का लावण्यात यावा, अशी मागणी वाघमारे यांनी केली.

कॉंग्रेस आमदार वीरेंद्र जगताप यांनीही मनोऱ्यातील भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलून धरला.मनोरा घोटाळा प्रकरणी ऑनलाईन लक्षवेधी देऊनही ती लागली नाही.कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके या नागपुरात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबल्या असून ही लक्षवेधी लागू देणार नाही, अशी भाषा करण्याची हिंमत या महिलेने दाखवली. त्यामुळे अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना सरकार किती संरक्षण देणार, असा सवाल जगताप यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com