गुड न्यूज : सामान्य नागरिकांना 1 मार्चपासून मिळणार मोफत कोरोना लस

देशात आरोग्य सेवकांना कोरोना लसीकरण सुरू आहे. आता दुसऱ्या टप्प्यात सामान्य नागरिकांना कोरोना लस मिळणार आहे.
corona vaccine will be given to common people from march
corona vaccine will be given to common people from march

नवी दिल्ली : देशात कोरोना लसीकरण मोहीम सुरू असून, आरोग्यसेवकांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येत आहे. आता लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. 1 मार्चपासून 60 वर्षांवरील नागरिक आणि विविध आजार असलेले 45 वर्षांवरील नागरिक यांना कोरोना लस दिली जाणार आहे. ही लस मोफत देण्यात येणार आहे. 

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास 16 जानेवारीला देशात सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन झाले होते. केंद्र सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश आहे. त्यानंतर ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणार आहे. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांचा यात समावेश असेल. 

याविषयी बोलताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, 1 मार्चपासून 60 वर्षांवरील नागरिक आणि विविध आजार असलेले 45 वर्षांवरील नागरिक यांना कोरोना लस देण्यात येणार आहे. ही लस मोफत दिली जाणार आहे. यासाठी सरकारने 10 हजार सरकारी आणि 20 खासगी लसीकरण केंद्रे तयार केली आहेत. 

देशात आढळणाऱ्या कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन अचानक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत नसल्याचे सरकारने म्हटले आहे. देशातील सध्याच्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 75 टक्के रुग्ण हे महाराष्ट्र आणि केरळ राज्यातील आहेत. या दोन्ही राज्यांत मागील काही काळापासून संसर्गात वाढ झाली आहे. यामुळे लसीकरणाचा वेग वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण अमेरिकेनंतर भारतात आहेत. भारतातील एकूण रुग्णांची संख्या 1 कोटी 10 लाख आहे. सरकारने केलेल्या अँटीबॉडीज सर्व्हेनुसार, देशातील 30 कोटींहून अधिक नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अंदाज आहे. 

सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  सध्या दोन कोरोना लशी उपलब्ध असून, आणखी सात कोरोना लशींवर काम सुरू असल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केले होते. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी ही माहिती दिली होते. प्रत्येक भारतीयाला ही लस देण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in