लशींचा पुरवठा मोदी सरकारच्या हाती, तरीही महाराष्ट्राला मिळतेय पाच पटीने कमी - Corona Vaccine shortage in Maharashtra says Health Minister Rajesh Tope | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

लशींचा पुरवठा मोदी सरकारच्या हाती, तरीही महाराष्ट्राला मिळतेय पाच पटीने कमी

वृत्तसंस्था
सोमवार, 12 जुलै 2021

देशात सर्वाधिक कोरोनाचा फटका महाराष्ट्राला बसला आहे.

मुंबई : मोदी सरकारने राज्यांना होणारा कोरोना (Covid-19) लशींचा पुरवठा पुन्हा स्वत:च्या हातात घेतला आहे. मागील महिन्यात 21 तारखेपासून या पुरवठ्याला सुरूवात झाली. पण 20 दिवस उलटूनही अद्याप लशींचा पुरवठा सुरळीत झाला नसून पुन्हा तुटवडा जाणवू लागला आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्राला दैनंदिन क्षमतेच्या तुलनेत जवळपास पाच पटीने कमी डोस मिळत आहेत. (Corona Vaccine shortage in Maharashtra says Health Minister Rajesh Tope)
 
देशात सर्वाधिक कोरोनाचा फटका महाराष्ट्राला बसला आहे. त्याचप्रमाणे सध्या सर्वाधिक लशींचे डोसही महाराष्ट्रातच देण्यात आले आहेत. पण लसीकरणाला सुरूवात झाल्यापासून महाराष्ट्राला क्षमतेच्या तुलनेत कमी डोस मिळत असल्याची तक्रार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून केली जात आहे. सोमवारीही माध्यमांशी बोलताना टोपे यांनी त्याचा पुनर्रच्चार केला. महाराष्ट्रात दररोज 15 लाख डोस देण्याची क्षमता असताना केवळ दोन ते तीन लाख लोकांनाच डोस दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

हेही वाचा : देशमुखांनंतर परमबीर सिंह यांचीही ईडीला हुलकावणी

महाराष्ट्रातील नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण करण्यासाठी दर महिन्याला सुमारे तीन कोटी डोस मिळणे आवश्यक आहे. पण लशींच्या तुवटवड्यामुळं सध्या लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. मे महिन्यात महाविकास आघाडी सरकारने 18 ते 44 वयोगटासाठी राखीव ठेवलेले डोस 45 वर्षांपुढील नागरिकांसाठी वळवले होते. जुलै महिन्यात मुंबई महापालिकेने आतापर्यंत लस नसल्याने दोनवेळी केंद्र बंद ठेवली होती. सातत्याने लसीकरण केंद्र बंद ठेवल्यामुळे लसीकरणाचे प्रमाणही कमी होत आहे. 

टोपे म्हणाले, तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्राला सात लाख डोस मिळाले. 12 जुलैला लशींचा साठी जवळपास संपेल. आतापर्यंत 3 कोटी 60 लाख डोस मिळाले असून त्यामध्ये महाराष्ट्र सरकारने थेट खरेदी केलेल्या 25 लाख डोसचाही समावेश आहे. महाराष्ट्राची दररोजची क्षमता 15 लाख डोस देण्याची आहे. पण सध्या केवळ दोन ते तीन लाख डोस मिळत असल्याची माहिती टोपे यांनी दिली.

दरम्यान, रविवारपर्यंत राज्यात 3 कोटी 65 लाख 25 हजार 990 डोस देण्यात आले आहेत. लशींचा तुटवडा असल्याने यंत्रणेला क्षमतेच्या तुलनेत कमी डोस मिळत आहेत. अनेकदा लसीकरण केंद्रांवर आलेल्या नागरिकांना परत पाठवावे लागत आहे. मुंबईतील सर्वात मोठ्या बीकेसी केंद्रांवर सोमवारीही नागरिकांना परत पाठवावे लागले. त्यामुळे प्रशासनाने ऑनलाईन वेळ घेऊन लसीकरणासाठी येण्याचे आवाहन केलं आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख