कोरोना अहवाल : सकाळी पॅाझिटिव्ह... सांयकाळी निगेटिव्ह...  - Corona report: positive in the morning ... negative in the evening ... | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना अहवाल : सकाळी पॅाझिटिव्ह... सांयकाळी निगेटिव्ह... 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020

महापालिका प्रशासनाने जनतेची काळजी घेण्याऐवजी त्यांचा कोरोना अहवाल चुकीचा देऊन नागरिकांना मनस्ताप होत आहे. 

मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी राज्यभर  'चेस द व्हायरस' ही मोहीम सुरू आहे. पण काही ठिकाणी कोरोना तपासणी अहवालातच गैरप्रकार होत असल्याने रूग्ण मात्र हवालदिल झाले आहेत. मुंबईसह राज्यात काही ठिकाणी असे प्रकार झाल्याचे उघड झाले आहे. महापालिका प्रशासनाने जनतेची काळजी घेण्याऐवजी त्यांचा कोरोना अहवाल चुकीचा देऊन नागरिकांना मनस्ताप होत आहे, याला जबाबदार असलेल्या संबधितांना मनसे स्टाईलने उत्तर दिलं जाईल, असा इशारा मनसे दिला आहे. 

सकाळी कोरोना अहवाल पॅाझिटिव्ह येतो, संध्याकाळी अहवाल निगेटिव्ह असल्याचं सांगितलं जाते. दहिसरमध्ये 900 बेडचं सेंटर उभारलं आहे. ते भरण्यासाठी हे केलं जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे. अॅटीजन टेस्ट 30 ते 40 टक्के आहेत. उफळ पांढर करायचं आहे का ? आम्ही मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिणार आहोत, मनसेचे म्हणणं आहे.  

सकाळी मुंबई महापालिकेचे कर्मचारी सांगतात तुम्ही पॅाझिटिव्ह आहात पण ते पेनाने निगेटिव्ह खोडून पॅाझिटिव्ह लिहिलं जातं, यावर विचारणा केली असता, संध्याकाळी निगेटिव्ह सांगितलं जातं, असं प्रकार नेहमीच घडत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.  

याबाबत मुंजाळी प्राविना यांनी सांगितले की मी कोरोनाची टेस्ट केली होती, सकाळी पॅाझिटिव्ह सांगितली, संध्याकाळी निगेटिव्ह सांगितलं. क्वारंटाइन व्हायला सांगितलं. पालिका आणि नंतर पोलीस ठाण्यातून फोन आला होता, आम्ही रिपोर्ट मागितला होता, खूप मागणी केल्यावर 19 तारखेला संध्याकाळी रिपोर्ट निगेटिव्ह आला. नंतर काल फोन आला रिपोर्ट पॅाझिटिव्ह आला आहे.   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख