सुशांतला मी गांजाच्या सिगारेट तयार करुन देत होतो; नीरजचा गौप्यस्फोट

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयने तपास सुरू केला आहे. या सुशांतचा स्वयंपाकी नीरज याने खळबळजनक दावा केला आहे.
cook neeraj used to roll marijuana cigarettes for actor sushant singh rajput
cook neeraj used to roll marijuana cigarettes for actor sushant singh rajput

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सुरू केला आहे. सुशांतचा स्वयंपाकी नीरज हा सुशांतला गांजाच्या सिगारेट तयार करुन देत असल्याचे समोर आले आहे. नीरज याने मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबात ही माहिती दिली होती. सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी गांज्याच्या सिगारेटचा बॉक्स रिकामा झालेला होता, असा खळबळजनक दावाही त्याने केला आहे.  

सीबीआयचे 15 जणांचे पथक मुंबईत तपासासाठी 20 ऑगस्टला दाखल झाले आहे. सीबीआयचे पथक सांताक्रूज येथील हवाई दलाच्या गेस्ट हाऊसवर थांबले आहे. सीबीआय पथकाने चौकशी सुरू केली आहे. सीबीआय पथकाने प्रथम सुशांतचा स्वयंपाकी नीरज याची चौकशी केली. यानंतर पथकाने मुंबईचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर हे पथक बांद्रा पोलीस ठाण्यात गेले होते. या प्रकरणाशी निगडित कागदपत्रे सीबीआयने मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतली आहेत. सीबीआयने सुशांतचे शवविच्छेदन करणाऱ्या कूपर रुग्णालयातील डॉक्टरांचीही चौकशी केली आहे. 

सुशांतच्या मृत्यू झाला त्यावेळी 14 जूनला घरात उपस्थित असलेल्यांमध्ये सिद्धार्थ पिठाणी आणि नीरज यांचा समावेश होता. सिद्धार्थ याची आधी ईडीनेही चौकशी केली होती. नीरज  याची सीबीआयने शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी चौकशी केली. त्यानंतर सीबीआयचे पथक सिद्धार्थ आणि नीरज या दोघांना घेऊन सुशांतच्या बांद्य्रातील घरी गेले. याचबरोबर सुशांतच्या मृत्यूवेळची परिस्थिती पुन्हा सीबीआयच्या फोटो आणि सायंटिफिक डिव्हिजनच्या सेंट्रल फॉरेन्सिक लॅबोरेटरीचे पथकाने निर्माण केली. पुन्हा एकदा सगळ्या घटनांचा क्रम सीबीआयने तपासला आहे. यातून नवीन काही धागेदोरे हाती लागतात का हे सीबीआय पथक पाहत आहे. यातून सुशांतची आत्महत्या की काही घातपात झाला हेही तपासण्यात येत आहे. काल रात्री उशिरा सीबीआयचे पथक या दोघांना घेऊन सुशांतच्या घरातून बाहेर पडले. आज पुन्हा सीबीआयचे पथक सुशांतच्या घरी तपासासाठी गेले आहे. 

सुशांत हा गांज्याच्या सिगारेट ओढत होता, अशी माहिती सुशांतच्या स्वयंपाकी नीरज याने मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबात दिली होती, असे एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे. नीरजने जबाबात म्हटले होते की, सुशांतला गांजाच्या सिगारेट मी तयार करुन देत होतो. सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवस आधीही मी गांज्याच्या सिगारेट त्याला तयार करुन दिल्या होत्या. मात्र, सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी गांजाच्या सिगारेटचा बॉक्स रिकामा आढळला होता. मी सुशांतच्या घरी एप्रिल 2019 पासून काम करत होतो. नंतर आजारी पडल्यामुळे मी काही दिवस आजारी पडलो. त्यामुळे मी नोकरी सोडून दिली होती. सुशांतचे व्यवस्थापक सॅम्युएल मिरांडा यांनी मला पुन्हा कामावर ठेवले होते. 

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com