congress writes to facebook ceo again over allegations of bias in favour bjp
congress writes to facebook ceo again over allegations of bias in favour bjp

काँग्रेसचे मार्क झुकेरबर्ग यांना दुसऱ्यांदा पत्र; पत्रास कारण की...

देशात फेसबुकवर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नियंत्रण असल्याच्या मुद्द्यावरुन मोठा गदारोळ उडाला होता. या प्रकरणीकाँग्रेसने फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांना पत्र लिहिले आहे.

नवी दिल्ली : देशातील सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी केलेल्या प्रक्षोभक विधानांकडे फेसबुक दुर्लक्ष करीत आहे, असा दावा वॉल स्ट्रीट जर्नलने केला आहे. या मुद्द्यावरुन मोठा गदारोळ उडाला आहे. भाजप सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) फेसबुक नियंत्रण असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता काँग्रेसने फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांना या महिन्यात दुसऱ्यांदा पत्र पाठवून या प्रकरणी कोणती पावले उचलली याची विचारणा केली आहे. 

वॉल स्ट्रीट जर्नलने फेसबुकबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. प्रक्षोक्षक विधानांबाबतचे फेसबुकचे नियम हे भाजप नेत्यांकडे दुर्लक्ष करणारे आहे, असे म्हटले आहे. सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी वेगळा न्याय आणि इतर पक्षांतील नेत्यांना वेगळा न्याय लावण्याचे काम फेसबुक करीत आहे. भाजप नेत्यांनी केलेल्या प्रक्षोभक विधानांवर कारवाई केल्यास कंपनीच्या भारतातील व्यवसायाला फटका बसेल, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटल्याचे वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तात म्हटले आहे. 

या मुद्द्यावरुनही राहुल गांधींनी भाजपला लक्ष्य केले होते. त्यांनी म्हटले होते की, देशात फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नियंत्रण आहे. त्यांच्या प्रभावाचा वापर करुन ते खोट्या बातम्या पसरवून समाजात दुही निर्माण करीत आहेत. अखेर अमेरिकी माध्यमांनी फेसबुकच्या खरेपणा जनतेसमोर आणला आहे. 

काँग्रेसने फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांना या महिन्यात या प्रकरणी दुसऱ्यांदा पत्र पाठविले आहे. याआधी काँग्रेसने 17 ऑगस्टलाही त्यांना पत्र लिहिले होते. याचबरोबर फेसबुकचे कर्मचारी आणि सत्ताधारी यांच्यातील संबंधाची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. 

याविषयी बोलताना सरचिटणीस के.सी.वेणूगोपाल म्हणाले की, भारतात फेसबुक हे भाजपबाबत पक्षपातीपणा करीत असल्याचा आरोपाबद्दल कोणती पावले उचलली याची विचारणा आम्ही कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांना केली आहे. याचबरोबर एक विदेशी कंपनी देशात येऊन सामाजिक सलोख्याला धोका निर्माण करु नये यासाठी आम्ही सर्व कायदेशीर मार्गांचा वापर करु. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com