गुजरातमध्ये भाजपला धक्का! 26 वर्षे ताब्यात असलेली महापालिका काँग्रेसने हिरावली

गुजरातमधील चार महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत.
गुजरातमध्ये भाजपला धक्का! 26 वर्षे ताब्यात असलेली महापालिका काँग्रेसने हिरावली
Congress File Photo

अहमदाबाद : गुजरातमधील (Gujarat) चार महापालिका (Municipal Corporation) निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. यातील भाणवड (Bhanvad) महापालिकेत काँग्रेसने (Congrss) भाजपला (BJP) मोठा धक्का दिला आहे. भाणवड महापालिकेवर 1995 पासून भाजपची सत्ता होती. काँग्रेसने आता या सत्तेला सुरूंग लावला आहे. भाणवड महापालिकेत 24 पैकी 16 जागा जिंकत काँग्रेसने निर्विवाद यश मिळवले आहे.

गुजरातमध्ये भाणवड, गांधीनगर, ओखा आणि थारा या महापालिकांची निवडणूक झाली होती. यापैकी भाणवड महापालिका काँग्रेसने खेचून आणली आहे. भाजपची 1995 पासून या महापालिकेत सत्ता होती. काँग्रसने 24 पैकी 16 जागा जिंकत भाजपचा पराभव केला. भाजपला केवळ आठ जागांवर समाधान मानावे लागले. भाजपने गांधीनगर, ओखा आणि थारा या महापालिकांतील सत्ता कायम राखली आहे. आम आदमी पक्षानेही या महापालिका निवणुकांत आपले अस्तित्व दाखवून दिले आहे.

ओखा महापालिका भाजपने आपल्या ताब्यात कायम ठेवली आहे. ओखा महापालिकेत भाजपने 36 पैकी 34 जागा जिंकल्या. येथे काँग्रेसला केवळ 2 जागा मिळाल्या. थारा महापालिकेतही भाजपने विजय मिळवला आहे. या महापालिकेत 24 पैकी 20 जागा जिंकत भाजपने सत्ता मिळवली असून, काँग्रेसला 4 जागा मिळाल्या आहेत.

Congress
वाहनमालकांना दणका! जुन्या वाहनांच्या नोंदणीबाबत मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

भाजपने गांधीनगर महापालिकेत सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवली आहे. महापालिकेच्या निवडणुकीत यावेळी भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला असून, 44 पैकी 41 जागांवर कमळ फुललं आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा सुफडा साफ झाला असून, केवळ दोन जागा मिळाल्या आहेत. तर 'आप'ने या वेळी खातं उघडलं असलं तरी केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

Congress
हवाई दलप्रमुख म्हणाले, महिला अधिकाऱ्यानं सांगितलं तसं घडलंच नाही!

गांधीनगर महापालिका अस्तित्वात आल्यानंतर 2011 मध्ये काँग्रेसनं सत्ता काबीज केली होती. त्यानंतर 2016 मध्ये भाजप व काँग्रेसला प्रत्येकी 16 जागा मिळाल्या होत्या. यावेळी भाजपनं सत्ता हस्तगत केली. त्यानंतर यावर्षी झालेल्या निवडणुकीत भाजपनं ऐतिहासिक कामगिरी करत काँग्रेसचा पराभव केला. भाजपला पहिल्यांदा एवढ्या जागा मिळाल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in