अधीररंजन चौधरींची खुर्ची वाचली...तूर्त कोणत्याही बदलास नकार

लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीररंजन चौधरी यांना पदावरुन हटवण्यात येईल, अशी चर्चा सुरू होती.
congress will not replace leader of opposition adhir ranjan chowdhury
congress will not replace leader of opposition adhir ranjan chowdhury

नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये (Congress) बदलाचे जोरदार वारे सुरू आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते (LOP) अधीररंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांना पदावरुन हटवण्यात येईल, अशी चर्चा सुरू होती. परंतु, चौधरी यांना तूर्तास बदलले जाणार नाही. संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर यावर निर्णय घेतला जाणार आहे. 

संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून सुरू होत आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीररंजन चौधरी यांनी पदावरुन हटवले जाणार अशी चर्चा सुरू आहे. पक्षाने आता एक व्यक्ती एक पद असा नियम अनुसरण्यास सुरवात केली आहे. चौधरी यांच्याकडे बंगालचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद आहे. त्यामुळे त्यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल, असे बोलले जात होते.  

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या ससंदीय समितीची बैठक आज होत आहे. परंतु, या अधिवेशनात चौधरी हेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते असतील. त्यांना बदलण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे. अधिवेशन संपल्यानंतर काँग्रेसमधील संघटनात्मक बदल सुरू होणार आहेत. त्यावेळी चौधरी यांना बदलण्यात येईल, अशी माहिती काँग्रेस सूत्रांनी दिली. 

अधीररंजन हे पश्चिम बंगालमधील खासदार आहेत. तसेच ते बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही आहेत. बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला एकही जागा मिळाली नाही. पक्षावर पहिल्यांदाच ही नामुष्की ओढावली असल्याने पक्षनेतृत्व त्यांच्यावर नाराज असल्याचे समजते. येत्या 19 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. हे अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. त्यामुळं अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच नवीन विरोधी पक्षनेत्याची घोषणा होईल, अशी शक्यता होती. आता ही शक्यता मावळली  आहे. 

दरम्यान, काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा तिढा अद्याप कायम आहे. तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळत नसल्याचे चित्र आहे. पक्षाचे नेते राहुल गांधी हे अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार नसल्याने काँग्रेसने आता नवीन पर्याय समोर आणला आहे. पक्षातील नेतृत्वाची पोकळी दूर करण्यासाठी एकापेक्षा जास्त उपाध्यक्ष नेमण्यासह संघटनात्मक पातळीवर फेररचना करण्यात येणार आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com