काँग्रेस देणार दोन मंत्र्यांना डच्चू; विधानसभा अध्यक्षांसह दलित आमदाराला मिळणार मंत्रिपद - congress will drop two ministers from punjab cabinet | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

काँग्रेस देणार दोन मंत्र्यांना डच्चू; विधानसभा अध्यक्षांसह दलित आमदाराला मिळणार मंत्रिपद

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 जुलै 2021

मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि सिद्धू यांच्यात संघर्ष सुरू आहे. यावर अखेर पक्ष नेतृत्वाने हा पर्याय शोधला आहे.  

नवी दिल्ली : पंजाब (Punjab) काँगेसमधील (Congress) अंतर्गत संघर्षावर हाय कमांडने अखेर तोडगा शोधला आहे. मुख्यमंत्री अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांच्याकडून लवकरच मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार आहेत. यात काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार असून, विधानसभा अध्यक्ष आणि एका दलित आमदाराचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पंजाबमधील अंतर्गत वाद पक्षाला विधानसभा निवडणुकीच्या आधी परवडणारा नाही. यामुळे पक्ष नेतृत्वाने यात लक्ष घातले आहे. पंजाबमध्ये लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल केले जाणार आहेत. काँग्रेस श्रेष्ठींनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. यात चरणजीत चन्नी आणि गुरप्रित कांगर यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात येणार आहे. त्यांच्या जागी विधानसभा अध्यक्ष के.पी.सिंग आणि आमदार व दलित नेते राजकुमार वेर्का यांना संधी दिली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहे. सिद्धू यांनी 30 जूनला प्रियांका गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती.  त्यानंतर राहुल गांधी आणि सिद्धू यांची भेट झाली होती. दरम्यान, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींची नुकतीच भेट घेतली होती. पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. यामुळे त्याआधी पक्षांतर्गत वाद मिटवण्यासाठी ही भेट होती. राज्यात काँग्रेसचे नेतृत्व अमरिंदर करतील हे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. पंजाबमध्ये काँग्रेसमधील संघर्ष वाढू लागल्याने दिवसेंदिवस नेतृत्वाची डोकेदुखी वाढू लागली होती. या पार्श्वभूमीवर अमरिंदरसिंग यांनी सोनिया गांधींची घेतलेली भेट महत्वूपर्ण मानली जात होती. 

हेही वाचा : पंजाबमध्ये नवज्योतसिंग सिद्घूंचे बल्ले बल्ले! 

पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. पण त्याआधीच काँग्रेसमधील अनेकांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. नवज्योतसिंग सिद्धू आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सातत्याने जोरदार खडाजंगी होत होती. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने काँग्रेसमध्ये उघडपणे दोन गट पडल्याचे दिसत होते. सिद्धू यांची लोकप्रियता जास्त असल्याने पक्ष नेतृत्वालाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे अवघड बनले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख