काँग्रेसने मुकूल वासनिक अन् नितीन राऊत यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

काँग्रेसमध्ये अतिशय वेगाने संघटनात्मक फेरबदल सुरू आहेत. विधानसभा निवडणुका होणाऱ्या राज्यांत काँग्रेसने निरीक्षकांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
congress party appoints mukul wasnik and nitin raut as observer
congress party appoints mukul wasnik and nitin raut as observer

नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदल अतिशय वेगाने सुरू आहेत. याचबरोबर पुढील काही महिन्यांत विधानसभा निवडणुका असलेल्या राज्यांत काँग्रेस जोरदार तयारी सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून काँग्रेसने या राज्यांसाठी निरीक्षकांच्या निवडी जाहीर केल्या. यात महाराष्ट्रीतील ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांच्यावर आसामची तर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर तमिळनाडू व पुद्दुचेरीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

या वर्षी आसाम, केरळ, तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होत आहे. या निवडणुकांसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. नुकतीच काँग्रेसने तमिळनाडूसाठी जम्बो कार्यकारिणी जाहीर केली होती. यात 32 उपाध्यक्ष, 57 सरचिटणीस, 104 चिटणीस, 56 कार्यकारी सदस्य यासह इतर दोनशेहून अधिक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. काँग्रेसच्या या जम्बो कार्यकारिणीवरुन मोठा गदारोळही झाला होता. 

आता काँग्रेसने यंदा विधानसभा निवडणुका होणाऱ्या राज्यांसाठी निरीक्षक जाहीर केले आहेत. आसाममध्ये भूपेश बाघेल, मुकुल वासनिक आणि शकील अहमद खान यांच्यावर जबाबदारी असेल. केरळमध्ये अशोक गेहलोत, लुझिनो फलेरियो आणि डॉ.जी.परमेश्वर यांची निवड करण्यात आली आहे. तमिळनाडू व पुद्दुचेरीत डॉ.वीरप्पा मोईली, एम.एम.पल्लम राजू, नितीन राऊत यांच्यावर धुरा सोपवण्यात आली आहे. पश्चिम बंगालची जबाबदारी बी.के.हरिप्रसाद, आलमगीर खान, विजय इंदर सिंगला यांच्यावर असेल. 

अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के.सी.वेणूगोपाल यांनी या निवडी जाहीर केल्या आहेत. हे सर्व निरीक्षक आता काँग्रेसचे सरचिटणीस आणि संबंधित राज्यांतील प्रभारींच्या संपर्कात राहून काम करतील. 

काँग्रेसमधील संघटनात्मक व नेतृत्व बदलाच्या मुद्द्यावर पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्र लिहिणाऱ्या 23 नाराज नेत्यांसोबत पक्ष नेतृत्वाने काही दिवसांपूर्वी बैठक घेतली होती. या बैठकीत पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी अखेर पक्षाच्या इच्छेनुसार काम करण्याची तयारी दर्शविली. यामुळे राहुल गांधी हे पुन्हा अध्यक्षपद स्वीकारतील, अशी अटकळ बांधली जात आहे. या महत्वाच्या बैठकीनंतर काँग्रेसमध्ये वेगाने चक्रे फिरू लागली आहेत. आता महाराष्ट्रासह तेलंगण, गुजरात आणि मध्य प्रदेश या चार राज्यांत संघटनात्मक फेरबदलाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com