शिवसेनेच्या संजय पवारांना काँग्रेस-राष्ट्रवादीने दिली पहिल्या पसंतीची १४ मते!

दुपारी तीनपर्यंत २८२ आमदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. विधानभवनात पाचनंतर मतमोजणी होणार आहे.
Mahavikas Aghadi Leaders Meeting
Mahavikas Aghadi Leaders MeetingSarkarnama

मुंबई ः राज्यसभेच्या अटीतटीच्या लढतीत महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी केलेल्या व्यूहरचनेनुसार शिवसेनेचे (Shivsena) उमेदवार संजय पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) पहिल्या पसंतीची १२ मते देण्यात आली आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाची ९ आणि राष्ट्रवादी समर्थक ३ अपक्ष आमदारांचा समावेश आहे. याशिवाय काँग्रेस पक्षाकडून (Congress) २ मते देण्यात आली आहेत, अशी माहिती महाविकास आघाडीच्या सूत्रांनी दिली. (Congress-NCP gives first choice 14 votes to Shiv Sena's Sanjay Pawar)

राज्यसभेसाठी आज मोठ्या चुरशीने मतदान होत आहे. न्यायालयाने परवानगी नाकारल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना आज मतदान करता आले नाही. मात्र, दुपारी तीनपर्यंत २८२ आमदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. विधानभवनात पाचनंतर मतमोजणी होणार आहे.

Mahavikas Aghadi Leaders Meeting
'आमचं काम फत्ते : ‘आयसोलेट’ असताना फडणवीसांनी काय केले, हे निकालात दिसेल'

मतदानापूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांची आणि आमदारांची एकत्रित बैठक हाॅटेल ड्रायडंटमध्ये घेतली होती. त्यामध्ये आघाडीच्या नेत्यांनी पाहिल्या पसंतीची मते कोणाला किती द्यायची, दुसऱ्या पसंतीची मते कोणाला द्यायची, याबाबत मार्गदर्शन केले होते. ड्रायडंटमध्ये ठरलेल्या रणनीतीनुसार आज मतदानाची अमलबजावणी महाविकास आघाडीकडून आज करण्यात आली.

Mahavikas Aghadi Leaders Meeting
लक्ष्मण जगतापांनी फडणवीसांना 'सीएम साहेब' म्हणून हाक मारली!

नेत्यांच्या रणनीतीनुसार राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी पहिल्या पसंतीची मते शिवसेनेच्या संजय पवार यांना देण्यात आली आहेत. तसेच, राष्ट्रवादी समर्थक तीन अपक्ष आमदारांनीही शिवसेनेच्या पवार यांना मते दिली आहेत. याशिवाय काँग्रेसच्या दोन आमदारांनीही पहिल्या पसंतीची मते शिवसेनेच्या आमदारांना दिली आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे संजय पवार यांना १४ मते तर मित्रपक्षाची शिवाय शिवसेनेची स्वतःची १३ मतेही पवार यांना मिळाली आहेत, त्यामुळे पहिल्या पसंतीची तब्बल २७ मते शिवसेनेच्या उमेदवार संजय पवार मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Mahavikas Aghadi Leaders Meeting
Rajya Sabha Election : आघाडीच्या दोन मतांना सुरूंग; भाजपच्या पथ्यावर पडणार का?

एमआयएम दोन, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले, समाजवादी पक्षाचे दोन यांच्यासह काही अपक्षांनी पवार यांना मते दिल्याचे सूत्रांनी सांगितले, त्यामुळे आमचे चार उमेवार निवडून येणार आहेत, असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com