गावकऱ्यांच्या शुद्ध पाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचा पुढाकार  - Congress MLA's initiative for clean water for villagers | Politics Marathi News - Sarkarnama

गावकऱ्यांच्या शुद्ध पाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचा पुढाकार 

संपत मोरे
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020

आमदार अमोल मिटकरी यांनी संजय बनसोडे यांना फोन केला. त्यांना 'गावच्या पिण्याच्या पाण्याचा सोडवा' अशी विनंती केली होती.  

पुणे : तेल्हारा तालुक्यातील चितलवाडी गावातील लोक खराब पाण्यामुळे किडनीच्या आजाराने त्रस्त झाले आहेत. या गावात शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी गावकऱ्यांच्या बैठकीतून पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांना फोन केला. त्यांना 'गावच्या पिण्याच्या पाण्याचा सोडवा' अशी विनंती केली होती.  

आमदार मिटकरी यांनी गावात विकासाकामासाठी आढावा बैठक घेतली. या बैठकीत गावकऱ्यांनी आमचा मुख्य प्रश्न पाण्याचा आहे.'अस सांगताच मिटकरी यांनी पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे पाणीप्रश्न मांडला. बनसोडे यांनीही या गावाचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असे सांगितले.

आमदार मिटकरी सध्या  जिल्ह्याचा दौरा करत आहेत. ते गावोगावी जाऊन लोकांचे प्रश्न समजून घेत आहेत. तेल्हारा तालुक्यातील चितलवाडी गावात आढावा बैठकीसाठी  गेले असता त्याना गावातील लोकांनी पाण्याचा प्रश्न सांगितला.गावातील अनेक लोकांना  दूषित पाण्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत.  

सिलिकाचे प्रमाण अधिक असल्याने व क्षारयुक्त पाणी असल्याने आतापर्यंत 20 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.अशी गावकऱ्यांनी माहिती सांगताच आमदारांनी पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांना बैठकीतून फोन लावला.लोकांच्या बैठकीत बोलताना मंत्री बनसोडे यांनी'चितलवाडी गावातील पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागेलं. आणि गावातील लोकांना शुद्ध पाणी मिळेल,' असे सांगितले.

हेही वाचा : भाजपच्या खासदारांनी यासाठी थोपटले महापालिकेविरूद्ध दंड  

मुंबई : आजपर्यंत नऊशे कोविड रुग्णांना बरे करणारे पावनधाम केंद्र फक्त भाजप कार्यकर्ते चालवतात म्हणून ते महापालिकेला नको आहे का, असे असेल तर ते महापालिकेने चालवावे. केंद्रचालकांनीही ते चालवायचे असेल तर तसे ठरवावे,
कोणीही तुम्हाला त्यापासून रोखू शकत नाही, असे सांगत उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी महापालिकेविरुद्ध दंड थोपटले आहेत. टाळेबंदीमुळे सध्या बंद असलेल्या कांदिवलीच्या पावनधाम जैन उपाश्रयात हे साठ खाटांचे केंद्र पोयसर जिमखाना, भाजप व पावनधाम यांच्यातर्फे चालविले जात आहे. स्वयंसेवी संस्थांनी चालवलेले मुंबईतील पहिले विलगीकरण केंद्र म्हणून ते प्रसिद्धीस आले होते. केंद्र सरकारनेही या केंद्राची प्रशंसा केली होती. मात्र आता रुग्णसंख्या कमी होत असल्याचे कारण देऊन महापालिकेने नुकतेच हे केंद्र बंद करण्याची व तेथील रुग्ण अन्य महापालिका रुग्णालयांमध्ये हलविण्याची नोटिस दिली आहे. त्याबाबत शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख