काँग्रेसच्या शेख, पाडवींना डच्चू तर शिवसेना, राष्ट्रवादी प्रत्येकी एक जागा भरणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल करण्यात येणार आहेत.
congress may remove aslam shaikh and k c padvi from cabinet
congress may remove aslam shaikh and k c padvi from cabinet

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल (Cabinet Reshuffle) करण्यात येणार आहेत. यात काँग्रेसचे (Congress) मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) आणि आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी (K.C.Padvi) यांना मंत्रिमंडळातून वगळले जाण्याची शक्यता आहे. या जागी दोन नवीन मंत्र्यांचा समावेश मंत्रिमंडळात होईल. याचबरोबर शिवेसना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रत्येकी एक मंत्रिपद रिक्त असून या जागाही भरण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिल भारतीय काँग्रेस समितीने राज्यातील काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यात  मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख आणि आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांना मंत्रिमंडळातून वगळले जाण्याची शक्यता आहे. या जागी दोन नवीन मंत्र्यांचा समावेश मंत्रिमंडळात होईल. कोरोना संकटाच्या काळात काँग्रेसच्या मंत्र्यांनी केलेल्या कामगिरीचे पक्षाने मूल्यमापन केले. यात दोन मंत्री कोरोना काळात घरातून फारसे बाहेर न पडल्याचे समोर आले. ते कोरोना संकटात सार्वजनिक ठिकाणी दिसले नव्हते. काँग्रेसने कोणत्या दोन मंत्र्यांना वगळायचे आणि कोणत्या नवीन दोन जणांचा मंत्रिमंडळात समावेश करायचे हेसुद्धा निश्चित केले आहे. 

याचबरोबर शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी एक मंत्रिपद रिक्त आहे. या जागाही भरण्यात येतील. तत्कालीन वनमंत्री व शिवसेनेचे आमदार संजय राठोड आणि तत्कालीन गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी मंत्रिपदाचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांची प्रत्येकी एक मंत्रिपदाची जागा रिक्त आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून ही जागा भरण्यात येणार आहे. मंत्रिमंडळातील फेरबदलाचा मुहूर्त मुख्यमंत्री ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वेळेच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. 

महाविकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार डिसेंबर 2019 मध्ये झाला. त्यावेळी राष्ट्रवादीला 14 (10 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्री), शिवसेनेला 12 (8 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्री), काँग्रेसला 10 (8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री) मंत्रिपदे मिळाली होती. त्याआधी मुख्यमंत्र्यांसोबत तिन्ही पक्षातील प्रत्येकी दोघांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एका कॅबिनेट मंत्र्याने राजीनामा दिल्यामुळे सध्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे 15, शिवसेनेचे 13 आणि काँग्रेसचे 12 मंत्री आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com