सचिन सावंतांनी 'ते' शासकीय पत्र समोर आणत फडणवीसांची केली कोंडी

फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत खुलासा केला होता.
Congress Leader Sachin Sawant tweets letter of officers Israel tour
Congress Leader Sachin Sawant tweets letter of officers Israel tour

मुंबई : देशात पेगॅसस (Pegasus) प्रकरण गाजत असतानाच महाराष्ट्रातील काही अधिकारी 2019 मध्येच इस्त्राईलच्या दौऱ्यावर गेल्याचे स्पष्ट झालं आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याची कबुली देताना हे अधिकारी कृषी अभ्यासासाठी गेल्याचे म्हटले होते. पण काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या दौऱ्याबाबत झालेला पत्रव्यवहारच उघड केला आहे. पत्रामध्ये कुठेही कृषी अभ्यासाचा उल्लेख नसल्याने फडणवीसांची अडचण झाली आहे. (Congress Leader Sachin Sawant tweets letter of officers Israel tour)

पेगॅसिस प्रकरणावरून मोदी सरकार अडचणीत आले आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले आहे. त्यातच महाराष्ट्रातही या स्पायवेअरच्या माध्यमातून हेरगिरी झाल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. 2019 मध्ये राज्य शासनातील काही अधिकारी निवडणूक निकाल लागल्यानंतर इस्त्राईलला गेल्याचे समोर आल्यानंतर हा वाद निर्माण झाला आहे. 

त्यावर फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत खुलासा केला होता. महाराष्ट्रातून इस्राईलला गेलेल्या अधिकाऱ्यांचा दौरा पुर्वनियोजित होता. तेथील शेतीचा अभ्यास करण्यासाठी ते गेले होते. हे अधिकारी माहिती व जनसंपर्क खात्यातील होते. त्यामुळं पाळत ठेवल्याचा आरोप चुकीचा आहे, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर बुधवारी सावंत यांनी इस्त्राईल दौऱ्याबाबतचे पत्र ट्विट केलं आहे. 

हे पत्र ट्विट करताना सावंत यांनी ' आदरणीय फडणवीस साहेब, यात शेती व शेती तंत्रज्ञान हा विषय नाही,' असं म्हटलं आहे. या ट्विटमध्ये मुंबईतील इस्त्राईलच्या दुतावासाने माहिती व जनसंपर्क संचालनालयाच्या सचिवांना 5 सप्टेंबर 2019 रोजी दौऱ्याचं निमंत्रण दिल्याचं एक पत्र आहे. तर या दौऱ्याबाबत संचालनालयाने  सामान्य प्रशासन विभागाच्या अवर सचिवांना 7 ऑक्टोबर 2019 रोजी या दौऱ्यावर पाच अधिकाऱ्यांना पाठविण्याबाबतची विनंती करणारे दुसरे पत्र आहे. 

या पत्रांमध्ये कुठेही कृषी किंवा कृषी तंत्रज्ञानाचा उल्लेख नाही. शासकीय जनसंपर्कातील नवे प्रवाह, सोशल मीडिया डिजिटल मार्केटिंग साधनांचा वापर, वेब मीडियाचा जनसंवासाठी वापर, डिजिटल मार्केटिंग साधनांचा वापर करून शासनाच्या विविध विभागांबरोबर समन्वय, आपत्कालीन स्थितीत माध्यमांचा वापर आदी मुद्यांवर या दौऱ्याचं नियोजन असल्याचं या पत्रांमध्ये म्हटलं आहे. 

दरम्यान, पेगॅसिसवर बोलताना मंगळवारी फडणवीस म्हणाले होते की, पेगॅसिसच्या बातम्यांमध्ये कुठलाही आधार नाही. केंद्र सरकारची कुठलीही एजन्सी अशाप्रकारे बेकायदेशीर हॅकिंग करत नसल्याचे सरकारनं स्पष्ट केलं आहे. एनएसओ ही पिगॅसिस तयार करणारी कंपनीनेही अशाप्रकारची यादी आधारहीन असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांनी संबंधित मीडिया हाऊसला नोटीसही जारी केली आहे. भारतात टेलिग्राफ अॅक्टच्या आधारे विशिष्ट पध्दत आहे, असे फडणवीस म्हणाले.  

पिगॅसिसमध्ये 45 देशांचा समावेश असताना केवळ भारतातच याची चर्चा होत आहे. भारतीय लोकशाहीला बदनाम करण्याचा हा कट आहे. जेव्हा भारत पुढे जातो त्यावेळी काही लोक असा कट करतात. काही मीडियाला चायनीज फंडिंग मिळाले असून तेच असा अजेंडा चालवत असल्याचा आरोपही फडणवीस यांनी यावेळी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com