राहुल गांधी चालले तमिळनाडूत जल्लिकट्टू बघायला!

तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकीचे राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. काँग्रेसने तमिळनाडूत जोरदार तयारी सुरू केली आहे.
Congress leader Rahul Gandhi to begin election campaign for Tamil Nadu on Pongal
Congress leader Rahul Gandhi to begin election campaign for Tamil Nadu on Pongal

नवी दिल्ली : तमिळनाडूमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमुळे वातावरण तापले आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून जय्यत तयारी सुरू आहे. काँग्रेसने ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तमिळनाडूसाठी नुकतीच जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे. आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी तमिळनाडूच्या प्रचार मोहिमेवर जात आहेत. पोंगल सणाच्या मुहूर्तावर त्यांचा दौरा होत असून, या दौऱ्यात जल्लिकट्टूचा थरारही अनुभवणार आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी हे तमिळनाडूतील प्रचार मोहिमेचा प्रारंभ 14 जानेवारीपासून करीत आहेत. या दिवशी पोंगल सण असून, तो तमिळनाडूसह दक्षिण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. राहुल गांधी हे पोंगलनिमित्त आयोजित जल्लिकट्टू कार्यक्रमाला 14 जानेवारीला हजेरी लावतील. त्यानंतर कोईमतूरच्या दौऱ्यावर ते 23 व 24 जानेवारीला असणार आहेत. 

या वर्षी विधानसभा निवडणूक असलेल्या पश्चिम बंगालसह इतर राज्यांच्या दौऱ्यावरही राहुल गांधी जाणार आहेत. तमिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम या राज्यांसह पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील निवडणूक यंदा होणार आहे. तमिळनाडूत यावर्षी एप्रिल अथवा मे महिन्यात निवडणूक होणे अपेक्षित आहे, असेही सूत्रांनी नमूद केले.  

तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. नुकत्याच अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के.सी.वेणूगोपाल यांनी या राज्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यात 32 उपाध्यक्ष, 57 सरचिटणीस, 104 चिटणीस, 56 कार्यकारी सदस्य यासह इतर दोनशेहून अधिक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. काँग्रेसच्या या जम्बो कार्यकारिणीची मोठी चर्चा सुरू आहे. मात्र, पक्षाने केवळ एकच खजिनदार नेमल्याने वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. 

पक्षाची 56 सदस्यीय कार्यकारी समिती नेमण्यात आली असून, याचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष के.एस.अळगिरी यांच्याकडे असून, सदस्यांमध्ये माजी केंद्रीय मंत्री चिदंबरम, मणिशंकर अय्यर, खासदार चेल्लाकुमार, बी. मणिकम टागोर, कार्ती चिदंबरम, एस. जोतिमणी, के.जयाकुमार यासह इतरांचा समावेश आहे.  

तमिळनाडूत काँग्रेसची द्रमुक या पक्षासोबत आघाडी आहे. काँग्रेस हा तमिळनाडूत कायम दुय्यम भूमिकेत दिसला आहे. राज्यात अण्णाद्रमुकची सत्ता असून, सलग दुसरा कार्यकाळ पक्षाला मिळाला आहे. राज्यात या वेळी द्रमुकच्या बाजूने कल झुकलेला दिसत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत अण्णाद्रमुकने भाजपसोबत आघाडी करुन फार मोठा फटका बसला होता. द्रमुकचा जनाधार वाढल्याचेच हे निदर्शक असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com