भाच्याला ईडीची नोटीस येताच ममता पंतप्रधान मोदींच्या भेटीला!

ममता बॅनर्जी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
भाच्याला ईडीची नोटीस येताच ममता पंतप्रधान मोदींच्या भेटीला!
Mamata Banerjee, PM Narendra ModiSarkarnama

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी सलग तिसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भाजपसह काँग्रेसनंही त्यांचा धसका घेतला आहे. निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांतीन नेते ममतांसोबत गेले आहेत. गुरूवारी मेघालयातील माजी मुख्यमंत्र्यांसह बारा आमदारांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे काँग्रेसला जोरदार धक्का बसला असून आता नेत्यांनी थेट ममतांवर शरसंधान साधण्यास सुरूवात केली आहे.

ममता बॅनर्जी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. पण त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेण्याचे टाळले. सोनिया गांधी व ममता यांच्यात चांगले संबंध आहेत. त्यामुळे प्रत्येक दिल्ली भेटीत ममता सोनियांची भेट घेतात. पण गुरूवारी ममतांनी सोनियांची भेट घेतली नाही. त्यावरून काँग्रेसचे नेते खासदार अधिर रंजन चौधरी यांनी ममतांवर निशाणा साधला आहे.

Mamata Banerjee, PM Narendra Modi
ते मंत्री आहेत, त्यांना हे शोभतं का? उच्च न्यायालयाचं मलिकांकडं बोट

चौधरी म्हणाले, भाच्याला ईडीचे समन्स आल्यानंतर त्यांचे वागणे अचानक बदलले आहे. त्याआधी त्यांनी भाजपच्या विरोधात एकत्र येण्यासाठी सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं होतं. आता त्या सोनिया गांधी यांना भेटल्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राग येईल, असा टोला चौधरी यांनी लगावला. मेघालयमधील पक्षफूटीवर चौधरी यांनी हे काँग्रेसला ईशान्येकडील राज्यांत फोडण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप केला.

केवळ मेघालयचं नव्हे तर ईशान्यकडील सर्वच राज्यांत काँग्रेसला फोडण्याचे षडयंत्र सुरू आहे. मी ममतांना आव्हान देतो, त्यांनी आधी त्या आमदारांना तृणमूलच्या तिकीटावर निवडून आणावे. मग त्यांचे पक्षात स्वागत करावे. हे सर्व प्रशांत किशोर यांनी लुईझिनो फलेरो यांनी केले आहे. आम्हाला हे माहित आहे, असंही चौधरी यांनी स्पष्ट केलं.

Mamata Banerjee, PM Narendra Modi
मलिक म्हणाले, आता वानखेडे अन् कुटुंबीयांवर बोलणार नाही!

दरम्यान, निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर आणि त्यांची टीम मेघालयातील काँग्रेस आमदारांच्या संपर्कात होते. मात्र याआधी संगमा यांनी तृणमूल काँग्रेसला कोणताही शब्द दिला नव्हता. काही दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेटीसाठी वेळ मागितली होती. काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी संगमा यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर तोडगा निघाल्याचे सांगण्यात आले होते.

संगमा यांना फोडण्याची जबाबदारी तृणमूल काँग्रेसनेच किशोर यांच्या संस्थेला दिल्याची चर्चा आधीपासूनच होती. गोव्यातील माजी मुख्यमंत्र्यांना फोडल्यानंतर आता मेघालयातील माजी मुख्यमंत्र्यांसाठी तृणमूलने फासे टाकले होते. प्रशांत किशोर हे पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममतांसोबत होते. निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी त्यांनी पार पाडली. त्यानंतर गोवा, त्रिपुरासह मेघालय व इतर राज्यांमध्ये काँग्रेला हादरे देण्यातही त्यांचाच हात असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in