मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावांना काँग्रेस नेतृत्वाकडून केराची टोपली - congress high command denies cm amarinder singh recommendations | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावांना काँग्रेस नेतृत्वाकडून केराची टोपली

वृत्तसंस्था
सोमवार, 19 जुलै 2021

मुख्यमंत्री नाराज असून, त्यांनी दिलेल्या सर्व प्रस्तावांना पक्ष नेतृत्वाने केराची टोपली दाखवली आहे. 

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांच्या विरोधात काँग्रेस (Congress) नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu)  यांनी उघड बंड पुकारले होते. हे बंड शमवण्यात अखेर पक्ष नेतृत्वाला यश आले असून, सिद्धू यांना प्रदेशाध्यक्षपदी बढती देण्यात आली आहे. असे असले तरी यामुळे मुख्यमंत्री नाराज आहेत. त्यांनी दिलेल्या सर्व प्रस्तावांना पक्ष नेतृत्वाने केराची टोपली दाखवली आहे.  

पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी.वेणूगोपाल यांनी सिद्धू यांची पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे पत्र काढले आहे. याचबरोबर चार कार्यकारी अध्यक्ष नेमण्यात आले आहेत. हिंदू, ओबीसी आणि दलित असा समतोल साधत या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात संगतसिंग गिलझियान, सुखविंदरसिंग डॅनी, कुलजित नागरा आणि पवन गोयल यांचा समावेश आहे. 

कॅप्टन यांनी कार्यकारी अध्यक्षपदासाठी सुचवलेल्या नावांना पक्षाने केराची टोपली दाखवली आहे. पक्षाने नेमलेले चारही कार्यकारी अध्यक्ष हे राहुल गांधींचे निष्ठावंत आहेत. गांधी परिवाराने सिद्धू यांच्या पारड्यात वजन टाकले आहे. विशेषत: प्रियांका गांधींमुळेच सिद्धू यांची सरशी झाली. राज्यातील नेत्यांचा विरोध असतानाही सिद्धू यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करुन गांधी परिवाराने कॅप्टन अमरिंदरसिंग यांनाही इशारा दिला आहे. 

पंजाबमध्ये पुढील वर्षी विधासनभा निवडणूक होत आहे. यात काँग्रेसने विजय मिळवल्यास राज्यात नेतृत्व करणार असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. त्यावेळी अमरिंदरसिंग यांना पर्याय म्हणून आताच पक्षातून बळ दिले जात आहे. राज्यातील नेतृत्वाला पर्याय निर्माण करण्याचे काम काँग्रेस नेतृत्व करीत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पंजाबमधील अंतर्गत वाद विधानसभा निवडणुकीआधी पक्षाला परवडणारा नसल्याने नेतृत्वाने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपद मागितले होते. पक्षाने मात्र, त्यांना प्रचारप्रमुखाची जबाबदारी देण्याची तयारी दर्शविली होती. सिद्धू हे प्रदेशाध्यक्षपदावर ठाम होते. अखेर सिद्धू यांची मागणी पक्षाच्या नेतृत्वाने मान्य केली आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांना हटवले गेले आहे. सिद्धू यांच्यासोबत चार कार्यकारी अध्यक्ष दिले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

हेही वाचा : पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार? पेट्रोलियम मंत्र्यांचा थेट सौदीच्या युवराजांना फोन 

मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील 2017 च्या विधानसभा निवडणुकीपासून वाद सुरू आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी काँग्रेसच्या विजयानंतर पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु, मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी याला विरोध केल्याने सिद्धू यांना दुसरे मंत्रालय देण्यात आले होते. तेव्हापासून दोघांचा वाद सुरू असून, आता सिद्धू यांनी उघड बंड पुकारले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख