पहिल्या परीक्षेत नाना टॅापवर : पंचायत समित्यांत काँग्रेस नंबर एकवर, ZP त नंबर दोन

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर लढण्याचा नारा देत पक्षकार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकले आहेत
पहिल्या परीक्षेत नाना टॅापवर : पंचायत समित्यांत काँग्रेस नंबर एकवर,  ZP त नंबर दोन
Nana Patolesarkarnama

मुंबई : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुकांत भाजपची (BJP) कामगिरी क्रमांक एकची ठरली आहे. नंदुरबार जिल्ह्यात डॉ. विजयकुमार गावीत यांना आलेले अपयश आणि नागपूर जिल्ह्यात काँग्रेसने (Congress) मारलेली मुसंडी वगळता अन्य सर्व भागात पक्षाला यश मिळाले आहे. जिल्हा परिषदेच्या २२ जागा जिंकून ओबीसींच्या मुद्द्यावर जनता आपल्या समवेत आहे हे सिद्ध करुन देण्यात भाजप यशस्वी झाले आहे.

Nana Patole
वंचित आणि महाविकास आघाडीत काॅंटे की टक्कर! : अकोल्यातील सत्तेच्या चाव्या अपक्षांकडे

काँग्रेसने १९ आणि राष्ट्रवादी काँग्रेसने १५ जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेने १२ जागा मिळवून महाविकास आघाडीची बेरीज ४६ वर गेली आहे. मात्र मुख्यमंत्रिपद मिळवलेली शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली जाणे हे अपयश मानले जाते आहे. गेल्या वेळी चौथ्या क्रमांकावर फेकली गेलेली काँग्रेस आता थेट दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर लढण्याचा नारा देत पक्षकार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकले आहेत. आजचा निकाल या पक्षाला नवसंजीवनी देणारा आहे.

Nana Patole
अमोल मिटकरींचा महाआघाडीला इशारा; भाजप विरोधात एकत्र या अन्यथा...

त्याच बरोबर पंचायत समितीमध्ये काँग्रेस नंबर एकचा पक्ष झाला आहे. काँग्रेस सर्वाधीक ३६ जागा मिळवल्या आहेत. भाजपने ३३ जागा जिंकल्या आहेत. तर शिवसेनेने २३ जागांवर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र, पंचायत समितीमध्ये १८ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी चौथ्या क्रमांकावर गेला आहे. यामध्ये सर्वात चांगली कामगीरी काँग्रेसने केली आहे. त्यांनी पंचायत समितीमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. जिल्हा परिषदेमध्येही त्यांनी दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्यामुळे नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्याने कार्याकर्त्यांमध्ये नवचैत्यन निर्माण झाले आहे.

Related Stories

No stories found.